तिसऱ्या लाटेसाठी सज्ज रहा : पालकमंत्री भरणे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

तिसऱ्या लाटेसाठी सज्ज रहा : पालकमंत्री भरणे

 

सोलापूर // प्रतिनिधी 

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सर्व विभागांनी सज्ज राहावे, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिल्या.           

जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी श्री. भरणे यांनी आज बैठक घेतली. नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपस्थित होते.           

श्री. भरणे यांनी बैठकीच्या प्रारंभी शहर आणि ग्रामीण भागातील कोविड विषाणूने संसर्ग झालेल्या रुग्णांच्या स्थितीबाबत माहिती घेतली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.           

श्री. भरणे यांनी सांगितले की,  काही वैद्यकिय अहवालानुसार तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. युरोपातील काही देशात रुग्णसंख्या वाढत आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, सार्वजनिक आरोग्य विभाग, पोलीस विभाग यांनी तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्याची तयारी करावी.

तिसऱ्या लाटेत बालकांना जास्त लागण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बालकांची काळजी घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आणि खासगी डॉक्टरांची मदत घेऊन यंत्रणा सज्ज ठेवावी. त्यासाठी आवश्यक असणारी औषधे, इंजेक्शन, आयसीयू यंत्रणा आदीबाबत आढावा घेऊन योग्य ती तयारी करावी. अशा सूचना श्री. भरणे यांनी दिल्या.           

जिल्ह्यातील माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यात अद्याप कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत, त्यामुळे या तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना श्री. भरणे यानी दिल्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here