पटवर्धन कुरोली येथे विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मा.श्री.अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पटवर्धन कुरोली प्रशाला व ज्युनिअर कॉलेज यांच्यावतीने वृक्षारोपण,रांगोळी, चित्रकला, निबंध स्पर्धा, कोवीड योध्दा सन्मानपत्र आणि बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्रशालेमध्ये विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले . या उपक्रमाचे उद्घाटन मा.अमर पाटील यांनी केले.प्रमुख उपस्थितीत बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर होते.

या उपक्रमामध्ये अभिजीत पाटील स्नेही मित्र परिवाराच्या वतीने विविध बक्षिस आणि पारितोषिक ठेवण्यात आली होती.

या विविध उपक्रमाचे आयोजन अभिजीत पाटील स्नेह परिवार पटवर्धन कुरोली यांच्याकडून करण्यात आले होते.

यावेळी धाराशिव कारखानाचे एमडी.श्री.अमर पाटीलसाहेब, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर जवळेकर, विठ्ठल कारखानाचे संचालक श्री.नवनाथ नाईकनवरे, ऑड. वैभवदादा नाईकनवरे, ग्रामपंचायत सदस्य श्री.अनिल सावंत. श्री.पांडुरंग नाईकनवरे, प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक दिपक नाईकनवरे, श्री.ज्ञानेश्वर उपासे,श्री.संतोष घुले,श्री.रणजीत उपासे श्री.गणेश मोरे श्री.गणेश नाईकनवरे. श्री.संभाजी उपासे,श्री.विलास मोरे,श्री.मदन जाधव,श्री.धनाजी बोबडे,श्री.गणेश जाधव, श्री.भगवान खेडेकर, श्री.विठ्ठल सावंत ,चि.तानाजी उपासे, मुख्याध्यापक श्री.लामकाने सर देशमुख सर, बाबर सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.
रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धा यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून आयुष्यात यशस्वी होण्यात मोठे योगदान मिळणार आहे. अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमामुळे समाजाला आणि समाजातील प्रत्येक घटकाला फायदा होईल.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here