10 वी परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन – भाऊसाहेब रूपनर 

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

10 वी परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन – भाऊसाहेब रूपनर 

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे फॅबटेक टेक्निकल कॅम्पस चे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर भाऊसाहेब रुपनर यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी, यशस्वी होण्यासाठी तंत्रशिक्षण घेऊन भावी वाटचाल करण्याचे आवाहन भाऊसाहेब रुपनर यांनी केले आहे. १० वी नंतर असणाऱ्या तीन वर्षाच्या इंजिनियरिंग डिप्लोमा साठी फॅबटेक मध्ये महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. सध्या या कोर्स ला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना फक्त दहावीचा आसन क्रमांक गरजेचा असून इतर कोणतेही कागदपत्रे नसतील तरीही त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेता येऊ शकते अशी माहिती डिप्लोमा चे प्राचार्य प्रा. शरद पवार यांनी दिली. तसेच जे विद्यार्थी SC,ST ,SBC व सर्व NT प्रवर्गातील आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशासाठी कसलीही कॉलेज ची फीस भरावी लागणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी इंजिनियरिंग डिप्लोमा शाखेमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रा. अभिजित गाडे( ९९८७७६४९४८) व प्रा. मोहन लिगाडे (९४०४६७०३९८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कॅम्पस डायरेक्टर श्री.संजय आदाटे यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here