08 वर्षांनंतर सोलापूर जिल्हा बँकेचा दर्जा वाढला

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

08 वर्षांनंतर सोलापूर जिल्हा बँकेचा दर्जा वाढला

सोलापूर // प्रतिनिधी

सशक्त असलेली जिल्हा बँक अशक्तच्या यादीत गेली ती प्रशासकांच्या सकारात्मक प्रयत्नातून बाहेर येत आहे. २०१३ मध्ये ”ड” श्रेणीत गेलेली बँक आता ”ब” श्रेणीत सामावली आहे. राज्यस्तरीय उच्चस्तरीय समितीच्या आढाव्यात नाशिक, जळगावसह इतर जिल्हा बँका नापास झाल्या मात्र एकमेव सोलापूर जिल्हा बँक पास झाली आहे.

राज्यातील सशक्त जिल्हा बंकांच्या यादीत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश होता. मात्र चुकीच्या पद्धतीने बेसुमार वाटप केलेले कर्ज जसजसे थकत गेले तसतशी बँकेची आर्थिक स्थिती कोलमडली. संपूर्ण कर्जवाटत ठप्प झाले तसेच मोठमोठे कर्जदार संचालक व शेतकरी जिल्हा बँकेकडे येणेच बंद केले. आता बँकेचे भवितव्य कठीण आहे असे दिसू लागल्याने तत्कालीन राज्य सरकारने जिल्हा बॅंकेवर प्रशासक नियुक्त केले.

मागील तीन वर्षांत जिल्हा बँक हळूहळू पूर्व पदावर येत आहे. अशक्त असलेल्या बँकापैकी सोलापूर, नाशिक व जळगाव या जिल्हा बँका सशक्त करण्यासाठी २०१८-१९ मध्ये टर्न आरांट प्लॅन करण्यात आला होता. या प्लॅनप्रमाणे या तीन जिल्हा बँकांना आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्याचे आव्हान होते. यापैकी केवळ सोलापूर जिल्हा बँकेने हे आव्हान पेलले आहे. बँकेचा ६.५ टक्के घसरलेला सीआरएआर ९.४१ टक्के इतका झाला आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याने २०१३ पासून ”ड” वर्गात असलेली बँक मार्च २०२१ मध्ये ”ब” वर्गात आली. उच्चस्तरीय समितीने सोलापूर जिल्हा बँकेचा आदर्श इतर जिल्हा बँकांनी घ्यावा, असे नमूद केले आहे.

रिझर्व्ह बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक भागेश्वर बॅनर्जी, राज्याच्या अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सैनिक, सहकार खात्याचे सचिव अरविंद कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, नाबार्डचे जी. एस. रावल व राज्य बँकेचे कार्यकारी संचालक अजित देशमुख यांचा समावेश असलेल्या उच्च स्तरीय समितीची आढावा सभा झाली. यामध्ये सीआरएआर, नफा व श्रेणीत सोलापूर जिल्हा बँकेने प्रगती केली असल्याचे नमूद केले आहे.राज्यातील नागपूर, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा, धुळे-नंदुरबार व जळगाव या अशक्त बँका सशक्त करण्याचा प्रयत्न आहे. मात्र यामध्ये केवळ सोलापूर जिल्हा बँकेलाच यश आले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here