02 तालुक्यातील तरुण वर्गातील मतदारामध्ये अभिजीत पाटील यांच्याच नावाची चर्चा! (साखर कारखानदारीतील कामामुळे अभिजीत पाटील यांचे नाव विधानसभेसाठी आघाडीवर)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

02 तालुक्यातील तरुण वर्गातील मतदारामध्ये अभिजीत पाटील यांच्याच नावाची चर्चा!

(साखर कारखानदारीतील कामामुळे अभिजीत पाटील यांचे नाव विधानसभेसाठी आघाडीवर)

मागील ७ ते ८वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवून साखर कारखानदारीमध्ये एक बंद पडलेल्या साखर कारखान्याचे “सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर” असे नाव कमावलेले पंढरपूर तालुक्यातील देगाव गावचे सुपुत्र उद्योगपती अभिजीत धनंजय पाटील हे आगामी दीड वर्षानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार समोर येत असून त्यांच्या कामाचा जर आपण चढता आलेख पाहिला; तर त्यांनी साखर कारखानदारीच्या माध्यमातून अनेक बंद पडलेले व मोठ्या प्रमाणात कर्ज झालेलेच साखर कारखाने चालवायला व भाडेतत्त्वावर घेतलेले असताना व पंढरपूर तालुक्याची आर्थिक नाडी असलेला सगळ्यात जुना असा विठ्ठल सहकारी साखर कारखाना त्यांनी नुकताच निवडणूक जिंकून, ताब्यात घेतला असून त्यांची दिवसेंदिवस प्रगती होत असल्याचे पाहून काही त्यांच्या पंढरपूर तालुक्यातील विरोधक मंडळींनी मागील आठवड्यात त्यांना “आयकर विभागाच्या” कचटयात अडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला; पण तो प्रयत्न सपशेल फसला असल्याचे समोर आले आहे. दोनच दिवसांपूर्वी अभिजीत पाटील यांची संपूर्ण चौकशी पूर्ण होऊन आयकर विभागाचे सर्व अधिकारी रिकाम्या हाताने परत माघारी गेल्याचे सर्वांना माहीती आहे.
त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे गटनेते नामदार प्रवीण जी दरेकर साहेब यांनी अभिजीत पाटील यांच्या पंढरपूर येथील कार्यालयात भेट दिली. त्यानंतर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अभिजीत पाटील यांची लोकप्रियता आणखीनच वाढली असून आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघासाठी, अभिजीत पाटील हेच आपले सक्षम आणि योग्य उमेदवार असल्याचे दोन्ही तालुक्यातील ज्येष्ठ राजकीय मंडळी मधून बोलले जात आहे.

अभिजीत पाटील यांनी आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षात जाहीर प्रवेश केलेला नाही. त्याचबरोबर साखर कारखानदारीशी ही निगडित सर्वच राजकीय पक्षातील सर्वच नेतेमंडळी भारतीय जनता पार्टीच्या तसेच राष्ट्रवादीच्याही सर्व नेते मंडळींबरोबर त्यांचे आजपर्यंत सोशल मीडियातून फोटो जोडलेले असताना व या फोटोतून त्यांचे या सर्वांबरोबर असणारे हितसंबंध पाहता आगामी काळात पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी एक नवखा नवतरुण युवक चेहरा, आमदार म्हणून निवडून आल्यास आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही.
आजपर्यंत पंढरपूर तालुक्याचा इतिहास पाहिला तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन म्हणजेच पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार असे. असे जरी त्रिकाल बाधित सत्य असले तरी अभिजीत पाटील कोणत्या पक्षाकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवितात का; हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here