ॲड.दिपक पवार यांची सक्तवसुली संचालनालयाकडे तक्रार (कल्याणराव काळेंच्या अडचणीत वाढ!)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी सीतराम साखर कारखान्यात जो काही महाघोटाळा केलेला आहे. त्याची सक्तवसुली संचनालय (ईडी), प्राप्तीकर विभाग (इन्कम टॅक्स), कंपनी कार्यालय तसेच पोलिसांत तक्रार दिली आहे. या संस्थांकडून त्याचा तपास सुरू आहे, त्यामुळे ईडी ही आता कल्याणराव काळे यांच्या उंबरठ्यावर आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी केला आहे.

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सभेत दीपक पवार यांचे कारखान्याचे सभासदत्व रद्द करण्यात आले आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी वरील गौप्यस्फोट केला आहे. दीपक पवार म्हणाले की, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याने माझे सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय बेकायदेशीर आहे, त्याविरोधात आम्ही प्रादेशिक सहसंचालक आणि निबंधक, सोलापूर तसेच साखर आयुक्त पुणे, सहकार आयुक्त आणि सहकर मंत्री यांच्याकडे दाद मागणार आहोत. त्यामध्ये कायदेशीर विजय आमचाच असेल, या प्रकरणात सत्याचाच विजय होईल, असा दावाही त्यांनी केला.

कल्याणराव काळे यांना पराभवाची चाहूल लागल्यामुळेच सहकार शिरोमणी कारखान्यातून माझे सभासदत्व रद्द करण्याचा डाव रचला आहे. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबीयांतील व्यक्तींना उमेदवारी न देता सामान्य माणसाला उभे करून निवडणूक लढविण्याची आमची तयारी आहे. पण, त्यासाठी काळे यांची तयारी आहे का, ते त्यांनी जनतेला सांगावे. सीताराम कारखान्याबाबत मी ईडी, इन्कम टॅक्स आणि कंपनी कार्यालय, पोलिसांत ज्या तक्रारी केलेल्या आहेत. या सर्वच विभागाकडून त्यांची चौकशी सुरू आहे. सभासदत्व कमी करून ते मला काखान्यातून बाजूला करू इच्छित आहेत. पण, त्यांनीदेखील निवडणुकीपर्यंत मैदानात राहावे; अन्यथा या संस्थांच्या एखाद्या जाळ्यात अडकले तर अडचणीचे होईल, असा इशाराही पवार यांनी कल्याणराव काळे यांना दिला.

कल्याणराव काळे यांनी सीताराम कारखान्यात जो काही महाघोटाळा केला आहे. त्याची वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी चौकशी सुरू ठेवलेली आहे. ईडी ही आता कल्याणराव काळे यांच्या उंबरठ्यावर आहे. याची चाहूल आणि जाणीव त्यांना झालेली आहे, हे आजच्या निर्णयावरून दिसत आहे, असा टोलाही पवार यांनी लगावला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here