१ ते १० मार्च अखेर अनुदानासह प्रति टन रू.२५००/-प्रमाणे ऊस बिल जमा:-आ.बबनदादा शिंदे २८ फेब्रुवारी अखेर तोडणी वाहतूक सर्व बील अदा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर येथील सन 2022-23 गाळप हंगाम सुरू असून या गळीत हंगामात जाहीर केल्याप्रमाणे 1 मार्च पासून प्रति टन रू.150/- प्रमाणे अनुदानासह प्रति टन रू.2500/- प्रमाणे ऊस बिल ऊस पुरवठादार यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले असल्याची माहीती संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर येथील सन 2022-23 चा गाळप हंगाम सुरू असून युनिट नं.1 पिंपळनेर येथे आजअखेर 18 लाख 02 हजार 101 मे.टन गाळप झालेले आहे. युनिट नं.2 करकंब दि.6 मार्च रोजी बंद झालेला असून युनिट नं.2 कडे 5 लाख 28 हजार 285 मे.टन गाळप झालेले आहे. या गळीत हंगामामध्ये ऊस पुरवठादार सभासद व ऊस पुरवठादार यांच्या ऊसाचे नुकसान होवू नये यासाठी दि.16 ते 28 फेब्रुवारी,2023 या कालावधीत गाळपास येणा-या ऊसासाठी एफ.आर.पी. पेक्षा प्रति टन रू.75/- व 1 मार्च ते हंगामपर्यंत गाळपास येणा-या ऊसासाठी प्रतिटन रू.150/-प्रमाणे जादा अनुदान देण्याचे कारखान्याने जाहीर केलेले आहे. त्यानुसार 1 मार्च ते 10 मार्च या कालावधीमध्ये गाळपास आलेल्या ऊसासाठी अनुदानासह प्रति टन रू.2500/- प्रमाणे ऊस बिल ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहे. कारखान्याने दि.16 ते 28 फेब्रुवारी,2023 या कालावधीत गाळपास आलेल्या ऊसासाठी अनुदानासह प्रति टन रू.2425/-प्रमाणे ऊस बील ऊस पुरवठादारांना अदा केलेले आहे.

तसेच या गळीत हंगामात युनिट नं.1 व 2 कडे ऊस तोडणी वाहतुक करणा-या वाहतुकदारांना 28 फेब्रुवारी अखेर ऊस तोडणी वाहतूक बिले अदा करण्यात आलेली आहेत अशी माहीती

सदरप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे व इतर अधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here