हा बदल काँग्रेस पक्षाला धक्का देणार” पाच राज्यांतील निकालांनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये निवडणुकांनंतर आता निकाल हाती आले आहेत. पंजाब वगळता इतर सर्व राज्यांमध्ये भाजपाला सत्ता राखण्यास यश आले आहे. तर दुसरीकडे पंजाबमधील काँग्रेसच्या अंतर्गत कलहाने मोठा पराभव झालेला आहे. पंजामध्ये आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारत बहुमत मिळवले आहे. उत्तर प्रदेशातही योगी आदित्यनाथ यांचेच सरकार पुन्हा येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“पाच राज्यांतील निवडणुकांपैकी चार राज्यांमध्ये भाजपाची सत्ता होती. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती पण आज तिथे अतिशय वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. पंजाबमधला हा बदल भाजपासाठी अनुकूल नाही. हा बदल काँग्रेस पक्षाला धक्का देणारा आहे. आपने दिल्लीमध्ये दोनदा ज्या प्रकारे यश संपादन केले त्याबद्दली मान्यता दिल्लीकरांमध्ये आहे. दिल्लीतल्या कामाचा परिणाम पंजाबमध्ये झाला हे स्पष्टपणे दिसत आहे. पंजाबसोडून बाकीच्या राज्यांमध्ये लोकांनी जे सत्तेमध्ये आहेत त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी भाजपाचे राज्य पुन्हा प्रस्थापित झाले आहे,” असे शरद पवार यांनी म्हटले.

“पंजाबमध्ये काँग्रेसची परिस्थिती चांगली होती. पण तिथे तीन चार महिन्यांमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाचा स्विकार पंजाबच्या जनतेने केला नाही. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटवण्याचा निर्णय लोकांना पसंद होता असे दिसून आले. हा निर्णय घेतल्यानंतर अमरिंदर सिंगसारख्या प्रभावशाली नेत्याने वेगळा पक्ष काढून भाजपासोबत जाण्याचे चित्र निर्माण केले.  हे पंजाबच्या जनतेला आवडले नाही. दिल्लीमधल्या शेतकरी आंदोलनामध्ये पंजाबमधल्या शेतकऱ्यांचा सहभाग जास्त होता. पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या मनात जो राग होता तो निवडणुकीत दिसून आला आहे,” असे शरद पवार म्हणाले.

“पंजाबमध्ये लोकांनी काँग्रेस, भाजपाला नाकारत आपच्या हातात सत्ता दिली आहे. केजरीवालांच्या दिल्ली सरकारमधील लोकांची मते जाणून घेतली तर ती आपच्या बाजूची असतात. मागच्या निवडणुकीत दिल्लीला गेल्यानंतर माझ्या निवास्थातील कर्मचाऱ्यांनीही आपला मत दिले होते. काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे आणि शेतकरी कायद्यांमुळे पंजाबच्या लोकांमध्ये राग होता. यामुळे तिथल्या लोकांना आपला संधी द्यावी असे वाटले,” असे शरद पवार यांनी म्हटले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here