स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त पंढरपुर उपनगरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख, सरसेनापती स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
हां कार्यक्रम शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा. मा. शिवाजीराव सावंत सर यांच्या अध्यक्षते खाली व शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख ( पंढरपुर विभाग ) मा.संभाजीराजे शिंदे, शिवसेना माजी सोलापूर जिल्हा प्रमुख मा.साईनाथभाऊ अभंगराव, शिवसेना माजी जिल्हा उपप्रमुख मा.जयवंत (आण्णा) माने या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये घेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात भव्य रक्तदान शिबीराने करण्यात येणार असून पंढरपुर मधील उपनगरात शिवसेना उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन तसेच निष्ठावंत शिवसैनिकांचा यथोचित सन्मान सोहळ्याचे व प्रभागातिल प्रतिष्ठित नागरीकांचे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी ६ वाजता महिलांचा हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला असून या सर्व कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उप शहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here