स्व.पी.बी. पाटील सर यांना दामाजी कारखान्यावर भावपूर्ण श्रध्दांजली

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष स्व।प्रकाश भिवाजी पाटील उर्फ पी।बी। पाटील सर यांचे दि।२५/५/२०२३ रोजी पुणे येथुन मंगळवेढा कडे येत असताना अपघात होवून उरळी कांचन येथील सिध्द्ीविनायक हाùस्पीटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले। त्यानिमित्त कारखान्याचेवतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक श्री। राजेंद्र पाटील, श्री। रेवणसिध्द लिगाडे सर, श्री। औदुंबर वाडदेकर, प्र।कार्यकारी संचालक श्री। रमेश जायभाय, कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री। विठ्ठल गायकवाड यांनी श्रध्दांजलीपर बोलताना आठवणी सांगून पाटील सरांच्या कुटूंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळावी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना केली।
कारखान्याचे चेअरमन श्री। शिवानंद पाटील श्रध्दांजलीपर विचार व्यक्त करताना म्हणाले, आपल्यातुन एक संघटन कुशल मार्गदर्शक संचालक काळाने हिरावुन घेतला आहे। सरांचे जाणेने मंगळवेढा तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। एक अजातशत्रु, मितभाषी व सतत हास्यवदनाने स्वागत करणारे व्यक्तीमत्व आपल्यातून काळाच्या पडद्याआड गेलेले आहे। जन्मभुमी मारापुर असुन त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पंढरपूर येथे प्राध्यापक म्हणून केली। पी।बी। पाटील सरांचे इंग्रजीचे क्लासेस पंढरपुर पंचक्रोषीत नावाजलेले होते। त्यांनी आपल्या भागातील मल्लेवाडीसारख्या खेडयात शिक्षणाची हायस्कुलची उभारणी करुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचे शिक्षणाची सोय केली। पुढे जावून त्यांनी यशस्वीरित्या बांधकाम ठेकेदारीचा व्यवसाय केला। पंढरपूर विधानसभेची निवडणुक लढवली। राजकीय क्षेत्रात काम करीत असताना त्यांनी प्रा।लक्ष्मणराव ढोबळे, डाù। रामचंद्र साळे, स्व।भारतनाना भालके, स्व।रतनचंद शहा यांचे विश्वासू सहकारी म्हणून काम केले। त्यांनी मंगळवेढा तालुका पंचायत समितीचे सदस्य, कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे। मंगळवेढा तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या अडचणीच्या प्रसंगी धावून जाणारा नेता म्हणून ओळख निर्माण केली। अशा या काळाच्या पडद्याआड गेलेल्या व्यक्तीमत्वाच्या कुटूंबियांच्या दुःखात कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद व कामगार सहभागी असुन पाटील सरांच्या कुटुंबियावर कोसळलेल्या बिकट प्रसंगातुन सावरण्यासाठी परमेश्वर ताकत देवो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना केली। त्यानंतर उपस्थित सर्वांनी श्रध्दांजली अर्पण केली।

सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री।तानाजीभाऊ खरात,मुरलीधर दत्तु,गौरीशंकर बुरकुल, गोपाळ भगरे, भारत बेदरे, दयानंद सोनगे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे,सुरेश कोळेकर यांचेसह कारखान्याचे चिफ इंजिनिअर धैर्यशिल जाधव, चिफ अकौंटंट रमेश गणेशकर, शेती अधिकारी कृष्णात ठवरे ,सर्व विभागप्रमुख, कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी भारत मासाळ व पदाधिकारी आणि कारखान्यातील कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here