स्वेरी मध्ये मेसा तर्फे तंत्रज्ञानावर आधारीत प्रदर्शन संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांकडून ‘मेसा’ अंतर्गत विविध तंत्रज्ञानावर आधारित मॉडेल्स चे प्रदर्शन  आयोजित करण्यात आले  होते.  
        संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. संदीप वांगीकर यांच्या नेतृत्वाखाली, समन्वयक प्रा. संजय मोरे यांच्या सहकार्याने या विविध तंत्रज्ञानावर आधारित मॉडेल्सचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून  उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनाचे उदघाटन विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात अवजड वाहनांचे विविध पार्टस, सैन्यातील रणगाडे, विविध क्षेपणास्त्रे, आयएनएस विक्रांत तसेच विविध अत्याधुनिक मॉडेल्सचे भव्य प्रदर्शन भरवले गेले होते. हे तंत्र प्रदर्शन पाहण्यासाठी तीन दिवस पंढरपूर सह सोलापूर जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी भेट देऊन तंत्रज्ञान विषयी सखोल माहिती जाणून घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकी विषयी आणखी जिज्ञासा निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून अभियांत्रिकी मधील विविध शाखांची पायाभूत माहिती दिल्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीनतम संकल्पना व त्यांचे मूर्त स्वरूप जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. या प्रदर्शनामध्ये संरक्षण विभागात महत्त्वाची भूमिका बजावणारी विविध वाहने, इंजिन्स, शेतीविषयक उपकरणे, आधुनिक कोळपणी, औषध फवारणी मशीन्स, त्यांचे नमुने, वीज निर्माण करणारा हायड्रोलिक पॉवर प्लांट, वेगवेगळे मिसाईल्स व त्यांचे विविध पार्टस याबाबत माहिती देण्यात आली. या उपकरणांचा वापर कुठे कुठे करण्यात येतो, खर्च किती येतो, त्यांचे कार्य कसे चालते याविषयी सविस्तर माहिती सांगणाऱ्या पोस्टरचेही  प्रदर्शन भरवले गेले होते. प्रवेशद्वाराजवळ विक्रांत या जहाजाची प्रतिकृती विशेष लक्ष वेधून घेत होती. अनेकजण विविध उपकरणांसोबत फोटो काढून घेत होते. एकूणच बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात अभियांत्रिकीमध्ये करिअर करण्यासाठी प्रेरणा देणारे हे प्रदर्शन होते त्यामुळे या प्रदर्शनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी मेसाचे विद्यार्थी अध्यक्ष निलेश ढेकळे, अक्षदा सोनवणे, श्रुती इंगळे, मृणाल पाटील, वैष्णवी खुने, अंजली विटकर, संध्या परदेशी, संदीप कांबळे, प्रवीण मोरे, रोहित इंगळे, प्रतीक मोरे, श्रीराम जाधव यांच्या सह अनेक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.
 
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here