स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘मॉक पार्लमेंट’ संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर- येथील स्वेरी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाचाच एक भाग म्हणून लोकसभेचे कामकाज कसे चालते? यावर सूक्ष्मपणे अभ्यास करून  विद्यार्थ्यांच्या सहभागातून  अभ्यासपूर्ण ‘मॉक पार्लमेंट’ चे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध राजकीय व्यक्तिमत्वांच्या छबी हुबेहूब अवतरल्या होत्या. 

         विद्यार्थ्यांना सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत व एकंदरीत राज्य व्यवस्थेबाबत माहिती असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.संदीप वांगीकर यांच्या  नेतृत्वाखाली मेसा (मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन) चे समन्वयक प्रा.संजय मोरे यांच्या सहकार्याने स्वेरीत ‘मॉक पार्लमेंट’चे भव्य आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या हुबेहूब  भूमिका साकारताना स्वेरीतील विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण, बोलण्याची लकब, वेशभूषा, हावभाव आदी बाबींचे उत्तम प्रदर्शन घडवले.  स्पर्धा परीक्षांमध्ये राजकीय प्रश्न हमखास विचारले जातात हाच धागा पकडून विद्यार्थ्यांनी अभ्यासाचाच एक भाग म्हणून या ‘मॉक पार्लमेंट’चे आयोजन केले होते. यामध्ये अच्छे दिन, जीएसटी, नोटाबंदी, राफेल, ३७० कलम, अर्थव्यवस्था, विकास कामे, शिक्षण पद्धती, राम मंदिर अशा विविध विषयांवर राजकीय भाष्य करताना विद्यार्थी  राजकीय नेत्यांमधील समतोलपणा अत्यंत खुबीने राखत होते. या ‘मॉक पार्लमेंट’ मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. यामध्ये सभागृह अध्यक्ष ओम बिर्ला यांची भूमिका आदित्य भूसनर, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका ज्ञानेश्वर कुंभार यांनी केली. त्याच प्रमाणे विद्यार्थी व त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा पुढील प्रमाणे आहेत- ओम इंगळे (गृहमंत्री-अमित शहा), सुप्रिया शेलार (अर्थमंत्री-निर्मला सीतारामन), रणवीर माने-देशमुख (परिवहन मंत्री-नितीन गडकरी), जिवराज इंगळे (शिक्षण मंत्री-धर्मेंद्र प्रधान) संध्या परदेशी (लोकसभा सदस्य मेनका गांधी), अश्विनी वाघमारे (रक्षा खडसे), श्रुती इंगळे (मीनाक्षी लेखी), अमित लोकरे (लघु उद्योग मंत्री नारायण राणे) तसेच विरुद्ध पार्टीमध्ये अंकिता हिंगमिरे (खा. सोनिया गांधी), प्रवीण कांबळे (खा.राहुल गांधी) रोहन क्षीरसागर (खा.शशी थरूर) मंगेश खपाले (खा.संजय राऊत), ऐश्वर्या गुरव (खा.सुप्रिया सुळे), तेजस निर्मळ (खा.अमोल कोल्हे), मृणाल पाटील (खा.भावना गवळी) प्रणाली पराडे (खा.अनुप्रिया पटेल), ओंकार अंकुशराव (खा.धैर्यशील माने) पत्रकार रिपोर्टर म्हणून सुयश बुरांगे व किसन शेळके यांनी कामकाज पाहिले. कार्यवाहक म्हणून श्रीराम जाधव, प्रकाश तिकटे, समाधान गोडसे, अभूथला पठाण, मंदार कुलकर्णी, रोहित मोरे, आकाश झालटे, बालाजी शेंबडे, प्रथमेश व्यवहारे आदींनी काम पाहिले. यामध्ये प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी देखील उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश बागल आणि अविनाश ननवरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुरज शिंदे यांनी मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here