स्वेरीत २ मे रोजी ‘मॉक एमएचटी- सीईटी २०२२ या सराव परीक्षे’चे आयोज

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
पंढरपूरः महाराष्ट्र स्टेट सीईटी सेल कडून ऑगस्ट २०२२ मध्ये अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्रच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी ‘एमएचटी- सीईटी २०२२’ ही परीक्षा राज्यभरात घेतली जाणार आहे. ऑगस्ट मध्ये घेतल्या जाणाऱ्या एमएचटी-सीईटी २०२२ या परीक्षेचा सराव व्हावा व विद्यार्थ्यांना या परीक्षेत अधिक उत्तम गुण मिळावेत या दृष्टीने गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये सोमवार, दि.०२ मे २०२२  रोजी दोन सत्रामध्ये कॉम्प्यूटर बेस्ड एमएचटी-सीईटी सराव परीक्षेचे (मॉक टेस्ट) आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
            इंजिनिअरींग व फार्मसीच्या प्रवेशाकरीता अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणार्‍या एमएचटी-सीईटी २०२२  या परीक्षा ऑगस्ट महिन्यात राज्यभर होत असून या परीक्षेची संपूर्ण तयारी व्हावी व विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने ही परिक्षा देता यावी या हेतूने सोमवार  दि.०२ मे २०२२  रोजी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूरमध्ये सकाळी १०.३० ते दुपारी १.३० व दुपारी २.०० ते ५.०० या दोन सत्रात ही ‘एमएचटी-सीईटी’ची सराव परीक्षा (मॉक टेस्ट) कॉम्प्युटर्स वर घेण्यात येणार आहे. स्टेट सीईटी सेल कडून घेतली जाणारी मूळ परीक्षा ही कॉम्प्युटर च्या आधारे घेतली जात असल्याने बऱ्याच वेळा सरावाअभावी विद्यार्थ्यांची धांदल उडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा सराव परीक्षांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेणे आवश्यक आहे. परगावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पंढरपूर बस स्टँड ते कॉलेज व कॉलेज ते पंढरपूर बस स्टँड अशी बसची सोयही केलेली आहे. या मॉक टेस्टचा निकाल परीक्षेनंतर दुसर्‍या दिवशी प्रत्येक परीक्षार्थ्याला एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे तसेच या मॉक टेस्ट मध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या अनुक्रमे पहिल्या तीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे ही दिली जाणार आहेत. तरी बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेचा लाभ घ्यावा. या एमएचटी-सीईटी २०२२ च्या मॉक टेस्ट संदर्भात अधिक माहीतीसाठी विद्यार्थ्यांनी टोल फ्री क्रमांक ८९२९१००६१४ व प्रा. यु. एल. अनुसे (मोबा. नंबर ९१६८६५५३६५)  यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here