स्वेरीत ए.आय.सी.टी.ई. च्या सहकार्याने ओरिएंटेशन सत्र संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल’ कडून ए.आय.सी.टी.ई.च्या मेंटॉर-मेंटी या उपक्रमांतर्गत नॅशनल इनोव्हेशन अँड स्टार्टअप पॉलिसी‘ या विषयावर झूम ऍप’ च्या माध्यमातून ऑनलाईन ओरिएंटेशन सत्र संपन्न झाले.

        प्रारंभी इनोव्हेशन सेलच्या स्वेरीच्या समन्वयक डॉ. विद्याराणी क्षीरसागर यांनी ओरिएंटेशन सेशन आयोजनाचा नेमका हेतू व  विस्तृत संकल्पना सांगून स्वेरीच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतची दैदीप्यमान वाटचाल सांगितली. हा सेशन ए.आय.सी.टी. ई.नवी दिल्ली’, ‘इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल’ व केंद्र सरकारच्या इनोव्हेशन सेल’ व शिक्षण मंत्रालय अंतर्गत कार्यरत असणाऱ्या मेंटॉर-मेंटी या सदराखाली नियुक्त करण्यात आलेल्या डॉ. भावना अंबुडकर यांनी स्वेरीच्या प्राध्यापकांसाठी घेतला. डॉ.भावना अंबुडकर या पिंपरी (पुणे) येथील डॉ.डी.वाय. पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्वेरीच्या प्राध्यापकांसाठी नॅशनल इनोव्हेशन स्टार्टअप पॉलिसी’ या विषयावर ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करत असताना महाविद्यालयांमध्ये इनोव्हेशन परिसंस्था कशी निर्माण करावी?, विद्यार्थ्यांना स्टार्टअप करण्यासाठी कशा पद्धतीने प्रेरीत करावेयाबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे ओरिएंटेशन सत्र संपन्न झाले. डॉ. अंबुडकर यांनी प्राध्यापकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. या ओरिएंटेशन सत्रासाठी स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अधिष्ठाताविभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. सोमनाथ ठिगळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here