स्वेरीज् सोबसच्या टीमने साधला टेंभुर्णीतील महिलांशी सुसंवाद उद्योजकता आणि महिला सक्षमीकरणावर केली दिलखुलास चर्चा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर- स्वेरीतील सोबस सेंटर ऑफ एक्सलन्स‘ च्या सदस्यांनी टेंभुर्णी (ता. माढा) येथील महीलांच्या स्वयंसहाय्यता गटांसोबत नुकताच सुसंवाद साधला. या उपक्रमांतर्गत महिलांसाठी नवीन व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींवर चर्चा करण्यात आली तसेच उद्योजकता आणि महिला सक्षमीकरणावर देखील दिलखुलास चर्चा झाली.

        ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने स्वेरीचे सोबस सेंटर ऑफ एक्सलन्स‘ हे कार्यरत आहे. विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांच्या उद्योग विषयक कल्पनांना गती देण्यासाठी व त्यांना मदत करून उद्योजकता विकसित करण्यासाठी हे सेंटर अधिक काम करत आहे. टेंभुर्णी येथील महिला उद्योजिका आणि त्यांचा व्यवसाय वाढ करण्याचा उत्साह पाहून स्वेरीच्या या सेंटरला अधिक कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळाली. ग्रामीण भागातील छोटे उद्योजक हे खाद्य उत्पादनांपासून ते गृहोपयोगी उत्पादनापर्यंत विविध व्यवसायांमध्ये मनोभावे परिश्रम करतात परंतु मनुष्यबळनिधीउत्पादन आणि विपणन यासंबंधीच्या समस्या जाणवतात हे या भेटी दरम्यान दिसून आले. उमा पवारज्या २० वर्षांपासून मसाला विकत आहेत आणि त्यांच्या उत्पादनाची विक्री आता वाढली आहे परंतु त्यांना मार्केटिंग करण्यासाठी आता योग्य बाजारपेठ हवी आहे. सुप्रिया जोशी या नवोदित उद्योजिका आहेत ज्यांना पापड बनवण्याच्या व्यवसायासाठी निधीची गरज आहे. सायरा कोरबू यांना टेलरिंगच्या व्यवसायासाठी २०० ते २५० महिला मिळू शकतात आणि त्यांना एसएचजीएस द्वारे देखील पाठिंबा दिला जातो. परंतु त्यांना व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी विपणन मदतीची आवश्यकता आहे. या झालेल्या चर्चेत सोबसच्या समन्वयक शारदा चौधरीएसएचजी समन्वयक शीला पाटील यांनी महिला उद्योजकांनी मांडलेल्या समस्या ऐकून घेतल्या तसेच बचत गटांच्या प्रतिनिधींशी देखील संवाद साधला. महिलांसाठी अनेक कार्यक्रम चालवणार्या शीला पाटील यांनी सांगितले की, उद्योग व्यवसाय करायला घाबरू नका, मेहनतीची लाज बाळगू नका. सुरवातीला अवघड वाटते पण पुढे उद्योगात झेप घेता येते.सोबस इंन्साईट फोरमने स्वेरी अर्थात श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट बरोबर सामंजस्य करार केला आहे. स्वेरीच्या सोबस सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सामाजिक समस्या सोडवण्यासाठी व स्थानिक ग्रामीण नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य केले जात आहे. हे सेंटर विद्यार्थ्यांना त्यांचे सामाजिक व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रशिक्षण, प्रेरणा देते आणि मदत करते. सोबस इंन्साईट फोरमही एक ना-नफा ना तोटा या तत्वावर चालणारी सेक्शन -८ कंपनी आहे. सर्वसमावेशक सहयोगी प्लॅटफॉर्म आणि इकोसिस्टमसह सामाजिक उपक्रमांना सक्षम करून शाश्वत विकास आणि उपजीविका निर्माण करण्यावर ही संस्था लक्ष केंद्रित करते. सोबस इन्साईट फोरमचे संस्थापक दिग्विजय चौधरी यांनी महिलांसाठी विविध रोजगाराच्या संधींवर चर्चा केली. यावेळी टेंभूर्णी मधील महिला बचत गटाच्या मनीषा लोहार, सुप्रिया जोशी, सारिका कोरबू , इतर महिला उद्योजक, सोबस टीमच्या रेशा पटेल, गिरीश संपत, इशान पंत, आकांक्षा सिन्हा आणि स्वेरीचे प्रा. गुरुराज इनामदार हे या चर्चासत्राला उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here