स्वेरीच्या सत्यम खांडेकर यांनी इतिहास रचला -स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

रोंगेस्वेरीच्या सत्यम खांडेकर यांना मिळाले वार्षिक ४१.५ लाखाचे पॅकेजपंढरपूर- ‘कधी कधी आपण विचार करतो वेगळा आणि केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे घडते वेगळेच! स्वेरीच्या सत्यम खांडेकर यांची अवस्था याहुन वेगळी नाही. नोकरी कोणीही मिळवतो पण प्रामाणिक प्रयत्न, त्यासाठी केलेला पाठपुरावा यामुळे सत्यमने जगप्रसिद्ध अशा अॅमेझॉन कंपनीकडून ४१.५ लाखाचे पॅकेज मिळवत एक नवीन इतिहास रचला.’ असे प्रतिपादन  स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले.             स्वेरीमध्ये आज सर्वोत्तम पॅकेज मिळविलेल्या सत्यम खांडेकर यांच्या सत्काराचे व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे हे सत्यमच्या कार्यावर प्रकाश टाकून गौरवोद्गार काढत होते. प्रारंभी स्वेरीतर्फे सत्यम खांडेकर, त्यांचे वडील हनुमंत खांडेकर व आई सौ. सविता खांडेकर या तिघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविकात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे यांनी स्वेरीचे माजी विद्यार्थी असलेल्या सत्यम खांडेकर यांना अॅमेझॉन कडून मिळालेल्या नोकरीतील संधीच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली. सन २०२१ साली सत्यम हनुमंत खांडेकर यांनी स्वेरी अभियांत्रिकी मधून उत्तीर्ण झाल्यानंतर सुरवातीला टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हीसेस त्यानंतर आणखी मोठ्या पॅकेज असलेल्या सहा कंपन्याकडून नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या. एवढ्यावर न थांबता सत्यम यांनी आपले प्रयत्न अधिक जोमाने चालू ठेवले. स्वेरीतील वसतिगृहातील अनुभव, शिक्षण घेताना कॅम्पसमध्ये मिळालेले संस्कार, कॅम्पस प्लेसमेंटच्या तयारीसाठी मिळालेले बहुमोल मार्गदर्शन आणि मदत व रात्र अभ्यासिका या बाबींच्या जोरावर कठोर परिश्रम करत सत्यम यांनी अभ्यास सुरूच ठेवला. स्वेरीमध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध प्रयत्नांचा जसे ऍडव्हान्सड टेक्निकल ट्रेनिंग, मॉक इंटरव्यूव, अॅप्टीट्युड क्लासेस, कॅम्पस ड्राईव्ह स्पेसीफीक ट्रेनिंग या गोष्टींचा प्रचंड फायदा झाला, हे सत्यम यांनी आवर्जून सांगितले. अॅमेझॉन कंपनीकडून वार्षिक ४१.५ लाखाचे पॅकेज असलेले पत्र हाती पडले, तेव्हा मात्र आनंदाला उधाण आले. कुर्डुवाडीमध्ये राहत असलेले खांडेकर यांचे मध्यम वर्गीय कुटुंब, वडील हनुमंत खांडेकर हे इंदापूर मधील पंचायत समितीमध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून काम पहातात तर आई सौ.सविता ह्या गृहिणी आहेत. त्यांची दहावी नूतन हायस्कूलमध्ये झाली तर बारावी कुर्डुवाडी मधीलच महात्मा फुले सायन्स महाविद्यालयातून झाली. त्यानंतर प्रथम वर्ष अभियांत्रिकीत स्वेरीत प्रवेश मिळविला. तेथून त्यांचे अवकाशाकडे झेप घेणे सुरु झाले. डॉ. रोंगे सरांचे भक्कम नेतृत्व, स्वेरीतील हाडाचे शिक्षक, अभ्यासासाठी स्वेरीत सातत्याने होत असलेला पाठपुरावा आणि करिअरच्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या प्रयत्नात स्वेरीने राखलेले सातत्य या बाबी सर्वात महत्वपूर्ण ठरल्या. त्यांचे मित्र अभिजित दरगुडे यांचीही मदत झाली. यावेळी सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे पुढे म्हणाले की, ‘कठोर परिश्रमाचे हे फळ असून प्रत्येकांनी यावर अधिक भर दिला पाहिजे. स्वतःमधील न्यूनगंड बाजूला सारून प्रयत्नात सातत्य राखल्यास इच्छित क्षेत्रात यश मिळू शकते. यावेळी डॉ. सोमनाथ ठिगळे यांनी देखील स्वेरीतील कल्चरवर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी असलेल्या विविध सोयी सुविधांची माहिती दिली. ‘सत्यम यांचा सुरवातीपासून स्वेरीकडेच कल होता. तेथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष आणि अधिक तयारी करून घेतली जाते, हे आमच्या लक्षात आले आणि त्याचा स्वेरीत प्रवेश निश्चित केला. स्वेरीच्या कल्चरमध्ये रुळल्यास उत्तम संस्कार घडतात, हे मात्र आम्हाला  विशेषत्वाने जाणवले.’ अशी प्रतिक्रिया सत्यमचे वडील हनुमंत खांडेकर यांनी दिली. सत्यमला डॉ. रोंगे सरांनी ‘स्वेरीचा आयकॉन’ अशा शब्दात संबोधल्यावर उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवत त्या शब्दांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सत्यम खांडेकर यांनी मिळविलेल्या या अदभूत यशाबद्दल स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here