स्वेरीच्या दोन विद्यार्थीनींची ‘एनटीटी डाटा’ या जपानच्या कंपनीत निवड

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूरः एनटीटी डाटा‘ या जपान स्थित कंपनीने घेतलेल्या निवड प्रक्रियेत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन विद्यार्थीनींची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.        

      एनटीटी डाटा‘ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंग विभागातून अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या आकांक्षा धनंजय हजारे व विविता कृष्णदेव ढेकळे या दोन विद्यार्थीनींची निवड केली असून यांना वार्षिक ५ लाख रु. इतके पॅकेज मिळाले आहे. श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये विविध राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय आणि नामांकित कंपन्या येत असतात आणि पात्र विद्यार्थ्यांची निवड करत असतात. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्वेरीचे विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. संबधित विद्यार्थ्यांना पदवीच्या दुसऱ्या वर्षापासूनच विशेष प्रशिक्षकांद्वारे बहुमोल प्रशिक्षण दिले जाते. स्वेरीमध्ये वार्षिक परीक्षेचा निकालसंशोधनेमानांकनेइन्फ्रास्ट्रक्चर याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून करिअरच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्लेसमेंटकडे देखील अधिक लक्ष दिले जाते व मोठमोठ्या कंपन्यांना हवे तसे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी घडविण्यासाठी प्रशिक्षित तज्ञांकडून उत्कृष्ठ मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे प्लेसमेंट मध्ये देखील स्वेरीने आघाडी घेतली असल्याचे दिसून येते. स्वेरीमध्ये शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रा.विक्रम चव्हाणप्रा.अविनाश मोटे व प्रा. मनोज देशमुख तसेच कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. सोमनाथ ठिगळे व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदेउपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्तकॅम्पस इनचार्जस्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्यअधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून एनटीटी डाटा‘ कंपनीत निवड झालेल्या आकांक्षा हजारे व विविता ढेकळे या दोन्ही विद्यार्थीनींचे अभिनंदन केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here