स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 गावामध्‍ये हर घर तिरंगा जनजागृती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या केंद्रीय संचार ब्युरोचा उपक्रम

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर, दि.9.- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 गावामध्‍ये हर घर तिरंगा, स्‍वराज्‍य अभियान, देशाच्‍या स्‍वातंत्र्याची, लोकशाहीची, एकात्‍मतेची, विकासाची गौरवशाली 75 वर्षे आणि कोविड लसीकरण अमृत महोत्‍सवाबाबत प्रचार चित्ररथ व ऑडियोच्‍या माध्‍यमातून जनजागृती करण्‍यात येणार असल्‍याचे जिल्‍हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

भारत सरकारच्‍या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने विशेष प्रचार रथाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या वतीने हर घर तिरंगा सायकल रॅली आसरा चौक ते होटगीस्टेशन असे सुमारे 12 किलोमीटर काढण्यात आली. यावेळी केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रचार वाहनाला माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपजिल्हाधिकारी चारुशीला देशमुख, उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे, तहसीलदार अमोल कुंभार, तहसीलदार जयवंत पाटील, एसआरपीएफचे सहाय्यक समदेशक माशाळे, तहसीलदार अमरदीप वाकडे, तहसीलदार मोहोळे व कार्यालय सहायक जब्‍बार हन्‍नुरे आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here