स्मार्ट सिटी कामकाजात निष्क्रीय निष्काळजी केलेल्या सी.ई.ओ. व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करा :- शिवसेनेची पोलीस आयुक्ताकडे मागणी.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

स्मार्ट सिटी कामकाजात निष्क्रीय निष्काळजी केलेल्या सी.ई.ओ. व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करा :- शिवसेनेची पोलीस आयुक्ताकडे मागणी.

 

सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेले काम अत्यंत धिम्या गतीने सुरु आहे. त्याच बरोबर निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. यात विशेष म्हणजे पूर्णपणे निष्काळजीपणाने कामकाज केल्याचे दिसून येते. त्यामुळे सोलापूरातील लहान मुले व नागरिकांची विनाकारण बळी गेले आहे. म्हणून संबंधित सी.ई.ओ. व अधिकारी आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. अशा मागणीचे निवेदन सोलापूर शिवसेनेच्या वतीने मा. पोलीस आयुक्त यांना देण्यात आले आहे.
उपजिल्हा प्रमुख मा. प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मा. पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात सोलापूर शहरात गेल्या दोन वर्षापासून स्मार्टसिटीचे कोठ्यावधी रुपयाचे कामे सुरु झाले आहेत. परंतु आजपर्यंत एकही रस्ता शहरातील पुर्णपणे झालेला नाही. अनेक ठिकाणी पिण्याचे पाण्याची पाईपची गळती, विविध प्रकारचे घालण्यात आलेले केबल वायर्स उघडे, ड्रेनेज लाईनचे निकृष्ठ दर्जाचे झाकण तसेच अतिशय गंभीर म्हणजे इलेक्ट्रीकल डी.पी.च्या माध्यमातून वायरी घालण्याचे काम सुरु असून परंतू सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणतीही काळजी घेण्यात आली नाही.
गेल्या काही महिन्यापुर्वी दत्त चौक येथे एका छोट्या मुलाला या स्मार्टसिटीच्या रस्यााचच्या कामामुळे ट्रॅक्टरखाली अपघाती जिव गमवावा लागला. तसेच या गलथान कारभारामुळे काल महात्मा गांधी रोड परिसरातील स्मार्टसिटीच्या कामाच्या माध्यमातून इलेक्ट्रीकल डी.पी. ही पुर्णपणे उघडी होती. कुठल्याही प्रकारची काळजी घेतली गेली नव्हती. परंतु त्या परिसरातील एका छोट्या मुलीला या डी.पी. चा स्पर्श झाला आणि तिलाही आपला जीव मुकावा लागला. अशा जिवघेण्या स्मार्ट सिटीच्या कामामुळे शहरातील नागरीकांमध्ये असंतोष निर्मांण झाला आहे.
सोलापूर शहराच्या अनेक मुख्य व्यापार पेठेत या स्मार्ट सिटीच्या कामामध्ये सर्वत्र रस्ते खोदून अर्धवट ठेवलेले, मोठमोठे पाईप अस्ताव्यस्थपणे पडून आहेत. अशा खड्यामुळे नागरीकांना मणक्याचा व कंबरदुखीचा त्रास होत असून अनेक ठिकाणी अपघात झालेमुळे हात, पाय मोडले गेले आहेत.
श्री. सिध्देश्वर मंदिर तलावात या स्मार्टसिटीच्या गलथान व हेतुपुरस्कर कारभारामुळे ड्रेनेजचे गहाणपाणी सोडण्यात आले होते. यामुळे जातीय धार्मिक तेढ निर्मांण अशा घटनामुळे होण्याचा संभव होता. या स्मार्ट सिटीच्या निष्क्रीय व बेजबाबदार काम करणाऱ्या अधिकाऱ्यामुळे प्रसंगी आंदोलन करण्याची प्रसंग आलस, कारण नसताना विनाकारण पोलीसामध्ये गैरसमज होवून राग निर्मांण होण्याचे प्रकार घडले आहेत. या हजारोकोटींच्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार असून कुठल्याही प्रकारचा दर्जेदार काम होत नाही. निकृष्ठ पध्दतीने काम केले गेले आहे. याचीही चौकशी शासनानी करावी.
वरील विषयांचे गांभीर्य लक्षात घेवून स्मार्ट सिटीचे सी.ई.ओ. श्री. त्र्यबंक ठेंगळे पाटील यांचेसह अधिकारी व कॉन्रॅ्यक्टर यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा आणि या कामामुळे होणाऱ्या त्रासातुन जनतेला मुक्त करावे. ही विनंती.
प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या शिष्ठमंडळात कामगार नेते विष्णु कारमपुरी (महाराज), महेश धाराशिवकर, विजय पुकाळे, रियाज शेख, श्रीनिवास बोगा, आदिंचा समावेश होता.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here