खाजगी जागेच्या घोषित झोपडपट्टीमधील लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेचा लाभ मिळणार – आ. प्रणिती शिंदे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर : आज दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी NIC च्या व्हिडीओ कॉन्फरन्स (Video Conference) व्दारे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) योजनेचा प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) श्री. अजित पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थित बैठक पार पडली.

सदर बैठकीमध्ये सोलापूर शहरातील शासनमान्य खाजगी घोषित झोपडपट्टीमधील लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून सदर योजनेकरीता मंजूर असलेला निधी खर्च होत नाही यामुळे गोर-गरीब, दलित वंचित घटकातील लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ मिळत आहे. सदर योजनेचा लाभार्थ्यांना लाभ मिळण्याकरीता खाजगी घोषित झोपडपट्टयामधील लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेतील बहुसंख्य प्रकरण प्रलंबित असून त्यांना तात्काळ मान्यता देण्यात यावी.
तसेच सोलापूर शहरातील शासकीय पोलीस वसाहतीमध्ये विविध सोयी-सुविधा, इमारत दुरुस्ती तसेच इतर विकास कामांकरीता आमदार प्रणिती शिंदे यांचा आमदार स्थानिक विकास निधी वापरता येत नाही. यामुळे सदर भागाचे विकास होण्याकरीता अनेक अडचणी येत आहेत. याबाबत व इतर विविध प्रश्नांबाबत मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) श्री. अजित पवार साहेब यांच्यासोबत आमदार प्रणिती शिंदे यांची सविस्तर चर्चा झाली.

या संदर्भात मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) श्री. अजित पवार साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून सांगितले कि, खाजगी जमिनीवरील झोपडपट्टी धारकांना महाराष्ट्रामध्ये खाजगी जागेवरील झोपडपट्टया SRA सारखे विविध योजनांचा लाभ शासनाच्या माध्यमातून मिळालेला आहे. त्याच धर्तीवर रमाई आवास योजना राबविण्याकरीता तात्काळ मान्यता देण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच शासकीय पोलीस वसाहत येथे आमदार स्थानिक विकास निधी नवीन जी.आर. नुसार वापरण्यात येत असून 10 टक्के निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here