सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने महिला काॅग्रेस स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण
सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने ३८ व्या महिला काँग्रेस स्थापना दिनानिमित्त काॅग्रेस भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
काॅग्रेस भवन येथील प्रांगणात महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा कु.हेमाताई चिंचोळकर यांच्या हस्ते व सेवादल शहर अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करुन सलामी देण्यांत आली. तसेच माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी व स्व.राजीव गांधी यांच्या पुतळ्यास तिरंगा हार घालून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महिला काँग्रेसच्या प्रभाग अध्यक्षा बसंती साळुंके यांच्या वतीने मिठाईचे वाटप करण्यात आले.
दिनांक १५ व १६ सप्टेंबर १९८३ मध्ये अखिल भारतीय काॅग्रेसचे अधिवेशन बंगळुर येथे भरले होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी महिला काँग्रेसला स्वतंत्र फ्रंटचा दर्जा देवून महिलांचा सन्मान वाढवला त्याचप्रमाणे राजकिय चळवळीत सुध्दा एक वेगळी ओळख महिला काॅग्रेसला मिळवून दिली असे प्रतिपादन महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा कु.हेमाताई चिंचोळकर यांनी आपले विचार व्यक्त करताना केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काॅ.च्या सुमन जाधव, माजी महापौर नलिनी चंदेले, महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा अॅड.करिमुन्निसा बागवान,कोंदणताई काकडे, प्रमिला तुपलवंडे, नगरसेविका परविन इनामदार, शोभा बोंबे, रतन डोळसे, अंजली मंगोडेकर, विमलताई जाधव, लता गुंडला, जगदेवी कदम, रेणुका दिनकर, सुहासना बागेहळ्ळीकर, संध्या काळे, निता ओहळ, नीता बनसोडे, मुमताज तांबोळी, चंदा काळे, बसंती साळुंके, मुनेराबी शेख, माया गायकवाड, अनिता भालेराव, मीना गायकवाड, सुरेखा घाडगे,आदि महिला काँग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सेवादल शहर अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे यांनी केले.