सोलापूर शहर काँग्रेस कमिटी वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संविधान वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी जगातील सर्वात महान बलशाली संविधान लिहिली. आणि हे संविधान 26 नोव्हेम्बर या दिवशी देशाला अर्पण केली. म्हणून आज भारतीय संविधान दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटी वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले, अनुसूचित जाती विभाग उमेश सुरते माजी नगरसेवक N.K. क्षीरसागर, अनुसूचित जाती विभाग महिला जिल्हा अध्यक्षा संध्याताई काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक N.K. क्षीरसागर यांनी संविधान दिनाची माहिती आणि महत्व सांगून संविधान वाचन केले.

या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, नगरसेवक शिवा बाटलीवाला, विनोद भोसले, माजी महापौर आरिफ शेख, महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, माजी नगरसेवक हारून शेख, मधुकर आठवले, अनिल मस्के, संजय गायकवाड, तिरुपती परकीपंडला, अप्पासाहेब बगले, VD गायकवाड, लक्ष्मीनारायण दासरी, नूर अहमद नालवार, रामसिंग आंबेवाले, युवराज जाधव, सुशील बंदपट्टे, अनुपम शहा, सुभाष वाघमारे, महेशकुमार मस्के, सत्यनारायण संगा, लालू सानी, आसाराम साठे, सुरेखा घाडगे, मुमताज तांबोळी, धीरज खंदारे, दत्तात्रय नामकर, सुनीता बेरा, शोहेब कडेचुर, श्रीकांत दासरी, अनिता भालेराव, साहिल मस्के, प्रशांत सोनवणे, मिलिंद सुरवसे, राजन निकाळजे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here