सोलापूर महापाकेतील सत्ताधारी भाजपने सोलापूरला साधे पाणी देण्यातही अपयशी :- प्रकाश वाले

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

काँग्रेसचा वॉर्डनिहाय बैठकांचा धडाका; जनजागरण अभियान

“गेल्या ५ वर्षात सत्ताधारी सामान्य सोलापूरकरांना साधे पाणी देऊ शकले नाही. त्यांच्या अनेक नगरसेवकांनी निवडून आल्यापासून जनतेला तोंड देखील दाखविलेले नाही. अशा लोकांना येणाऱ्या निवडणुकीत नक्की धडा शिकवा.” अशा शब्दात कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
जनजागरण अभियाना अंतर्गत काँग्रेसने वॉर्डनिहाय बैठकांचा धडाका लावला आहे. सत्ताधाऱ्यांविषयी असलेल्या नाराजीला तोंड फोडण्याचे काम याद्वारे करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज लोधी गल्ली, प्रभाग क्रमांक १७ येथे ही बैठक घेण्यात आली.
वाले पुढे म्हणाले की, माननीय आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या माध्यमातून प्रभाग १७ येथे देखील अनेक विकास कामे झाली. येथील लोकांच्या अडीअडचणीच्या वेळी त्या वैयक्तिक मदत करत असतातच. बहिणी सारख्या तुमच्या पाठीशी उभे राहणाऱ्या ताईंचे हाथ बळकट करण्यासाठी काँग्रेसचा नगरसेवक निवडून द्या.

माजी उपमहापौर माणिकसिंग मैनावाले यांना श्रद्धांजली अर्पण करून बैठकीची सुरुवात झाली.

माजी आमदार प्रकाश यलगुलवार म्हणाले की, गेली अनेक वर्षे आपण आपल्या भागातून काँग्रेस पक्षाचा आमदार भरघोस मतांनी निवडून देता त्याबद्धल पक्ष आपला सदैव ऋणी राहील. समतोल विकास साधण्याकरिता यंदा पक्षाचा नगरसेवक देखील निवडून आणा.

*बैठकीचे आयोजन सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रामसिंग आंबेवाले होते.*

याकार्यक्रमास प्रमुख उपस्थिती शहर कॉंग्रेस कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, सोमपा गटनेते चेतनभाऊ नरोटे, माजी सभापती देवेंद्र भंडारे, नामदेव मनसावाले, नरसिंग आसादे, जेम्स जंगम, बाबू म्हेत्रे, रवी आंबेवाले, अंबादास बाबा करगुळे, वाहिद बिजापुरे, रमेश फुले, लोधा वकील, संजय मैनावाले, दाऊद नदाफ, लखन गायकवाड, राजेश सकी, राजेश झंपले, राहुल दिल्लीवाले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमास प्रभागातील कॉंग्रेस कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

सूत्रसंचालन तिरुपती परकीपंडला यांनी तर आभार प्रदर्शन संजय मैनावाले यांनी केले.

 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here