सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील कामगारांना महागाई भत्ता लागू करा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला यांची मागणी

 

सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील कामगारांना एकोणचाळीस टक्के महागाई भत्ता व वाहन भत्ता लागू करावे अशी मागणी सोलापूर महानगरपालिका परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला यांनी सोलापूर महापालिका परिवहन व्यवस्थापक ईरण्णा वन्यालोलु यांच्याकडे निवेदन देऊन केले आहे.

या निवेदनाद्वारे परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला यांनी अशी मागणी केली की, सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू आहे. पण सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू नाही. सोलापूर महानगरपालिका परिवहन समितीने महागाई भत्ता व वाहन भत्ता लागू करण्याविषयी विषय क्रमांक 1/46 ठराव क्रमांक 46 दिनांक 14 सप्टेंबर 20196 रोजी एकमताने मंजूर केलेला आहे. पण गेल्या पाच वर्षांपासून त्याची अंमलबजावणी झाली नाही. परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांचे वेतन तुटपुंजे असून त्यांना तातडीने एकोणचाळीस टक्के महागाई भत्ता व वाहन भत्ता लागू करावे अशी मागणी केली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here