सोलापूर जिल्ह्यातील विविध भागातील चोरीस गेलेले १२ मोबाईल हँडसेट हस्तगत! (सोलापूर ग्रामीणची मोठी कारवाई)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्ह्यातील विविध भागातील चोरीस गेलेले १२ मोबाईल हँडसेट हस्तगत!

(सोलापूर ग्रामीणची मोठी कारवाई)

सन 2022 मध्ये 10 व सन 2023 मध्ये 2 सॅमसंग, ओपो, टेकनो, पोको, व विओ अशा विविध कंपनीचे मोबाईल हॅन्डसेट हरविल्याची नोंद सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात रहात असलेल्या नागरिकांनी सोलापूर तालुका, पोलीस ठाणेस केली आहे.

हरविलेले मोबाईल हॅन्डसेटचा शोध घेऊन ते संबंधीत नागरिक यांना परत देण्याच्या मागावर पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असताना त्यांना त्यांचे गोपनिय बातमीदार यांचे करवी मिळालेल्या बातमी नुसार सन 2022 मधील 10 व सन 2023 मधील 02 असे एकूण 12 सॅमसंग, ओपो, टेकनो, पोको, व विओ कंपनीचे 1 लाख 20 हजार रूपये किंमतीचे मोबाईल हॅन्डसेट हस्तगत करून ते संबंधीत नागरिक यांना सुपुर्द करण्याची कार्यवाही करण्याचे कामकाज चालु आहे.

यापुढे अशा हरविलेल्या मोबाईलचा शोध घेऊन ते संबंधीत नागरिक यांना परत देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती श्री.नामदेव शिंदे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांनी सांगितले आहे.

सदरची कामगिरी शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, हिंमत जाधव, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर याचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी नामदेव शिंदे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरणातील सुरज निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक, पोहवा/संजय देवकर, पोना/शशीकांत कोळेकर, पोलीस अंमलदार/ पैंगबर नदाफ, फिरोज बारगीर, वैभव सुर्यवंशी व सायबर पोलीस ठाणे कडील धीरज काकडे यांनी बजावली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here