सोलापूर जिल्ह्यातील ऊस दर आंदोलनात प्रहार ची उडी २६ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रक्तदान

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्ह्यातील ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनास लक्ष न करता कारखानदाराची गाडी फोडणाऱ्या प्रहार कार्यकर्त्याला पन्नास हजार रुपयांचे बक्षीस,२६तारखेपर्यंतचा अल्टीमेटम जाहीर करण्यात आला आहे.
गेल्या एक महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यातील ऊस गळीत हंगाम सुरू झाला असून अनेक संघटनांनी शेतकऱ्यांच्या उसाला भाव वाढवून मिळण्यासाठी अनेक प्रकारे आंदोलन केले असून गेल्या चार महिन्यापासून जिल्ह्यात पावसाचा हाहाकार होता आणि या पावसामुळे शेतकरी पुरता मोडला असून तरीसुद्धा जिल्ह्यातील कारखानदारांना घाम फुटत नाही,शेजारीच असलेल्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यात जवळजवळ 3000,3200 चा दर अनेक कारखानदारांनी जाहीर केला असून सोलापूर जिल्ह्यात मात्र कारखानदारांकडून याबाबत उदासीनता दिसत आहे.
अनेक संघटना कडून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना टारगेट केले जात आहे यावर बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांनी सांगितले की ऊस वाहतूक वाहनधारक हे सुद्धा शेतकऱ्याचीच पोर आहे त्यांनी स्वयंपूर्ण ऊस वाहतूक थांबवावी परंतु संघटनांनी सुद्धा त्यांच्या वाहनाची नासधूस न करता कारखानदारांच्या गाड्यांना टार्गेट करावे असे सांगितले,यावेळी त्यांनी 26 तारखेपर्यंत अल्टिमेटम संपल्यानंतर रक्तदान करून नंतर जो कार्यकर्ता चेअरमन ची गाडी फोडेल त्याला पन्नास हजार रुपयांचे बक्षीस सुद्धा जाहीर केले.
अनेक ऊस वाहतूकदारांच्या वाहनांवर गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यात अनेक ठिकाणी ओव्हरलोड साठी आरटीओ कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे याबाबत सुद्धा जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाली त्यावर इथून पुढे वाहनधारकावर आरटीओने कारवाई करू नये अशा सूचना जिल्हाधिकारी साहेबांनी दिल्या…
यावेळी प्रहार चे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील शहराध्यक्ष अजित कुलकर्णी संपर्कप्रमुख जमीर शेख कार्याध्यक्ष खालीद मणियार तालुका अध्यक्ष संदीप तळेकर,दिलीप ननवरे मुदस्सर हुंडेकरी समर्थ गुंड यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here