सोलापुर शहर युवक काँग्रेसचे आत्ता मिशन महापालिका-2022

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापुर शहर युवक काँग्रेसचे आत्ता मिशन महापालिका-2022

आ. प्रणिती शिंदे यांचा शहर दक्षिण मध्ये झंझावात, एकाच दिवशी चार ठिकाणी शाखा उद्द्घाटन

सोलापूर:- सोलापूर शहर युवक काँग्रेस च्या वतीने मिशन महापालिका-2022 च्या माध्यमातून वार्ड चलो अभियान राबवित असून त्याची सुरुवात आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक २४ मध्ये गोविंदश्री मंगलकार्यालाय जवळ, भारती विद्यापीठ चैतन्य नगर भाजी मंडई, झकास हॉटेल शेजारी सैफुल, बॉम्बे पार्क अश्या चार ठिकाणी शाखा उद्द्घाटन व गोविंदश्री मंगल कार्यालय येथे युवकांचा मेळावा घेण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर शहर अध्यक्ष प्रकाश वाले, जेष्ठ नेते सुधीर खरटमल, नगरसेवक बाबा मिस्त्री, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, गटनेते चेतन नरोटे, युवक कॉंग्रेस शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, माजी महापौर अलकाताई राठोड़, नलिनीताई चंदेले, शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, दक्षिण सोलापूर युवक अध्यक्ष सैफन शेख, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, NSUI अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, सरचिटणीस केशव इंगळे, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, युवक कार्याध्यक्ष ओमकार गायकवाड, युवराज जाधव, सुशील बंदपट्टे, राहुल वर्धा, राहुल गोयल, प्रभाकर सादुल, प्रवीण जाधव, तिरुपती परकीपंडला, प्रवीण जाधव, अरमान पटेल, राजेंद्र शिरकुल, सुभाष वाघमारे, शरद गुमटे, प्रभाकर सादुल, प्रतीक आबुटे, मल्लू सलगरे, मनोहर माचर्ला, किरण राठोड, सागर शहा, यांच्यासह इतर पदाधिकारयांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते नूतन पदाधिकारी श्रीदीप हसापुरे, निलेश व्हटकर, रवींद्र शिंदे, रोहन साठे, विकास कांबळे बाटलीवाला, आदिल शेख, यतीश देशमुख तसेच सेवादलचे अजयकुमार सुतार यांना निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार आला.

यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, गेल्या काही वर्षापूर्वी नागरिकांनी मोदी सरकारला व सोलापूर महापालिकेत भाजपाला मोठ्या अपेक्षेने निवडून दिले होते. पण मोदी सरकार सत्तेवर आल्यापासुन लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खाद्य तेलाच्या दरात प्रचंड दरवाढ झाली आहे महागाई वाढली, चुकीच्या पद्धतीने केलेल्या नोटबंदी व GST ने उद्योग धंदे बंद पडले, युवकांचे रोजगार गेले, लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. सोलापूर शहरात सुद्धा महापालिकेत गटातटाचे भांडणे, नगरसेवकांना विकास निधि नाही, सहा ते सात दिवसाआड पाणी तेहि कमी दाबाने, शहरात सर्वत्र खड्डे, दलदल, धुळीचे साम्राज्य पसरले, स्मार्ट सिटीचे अर्धवट कामें, या महापालिकेतील सत्ताधारी भाजपवाल्यांनी सोलापुरचे वाटोळे केले असून त्यांना सत्तेवरुण घालवण्यासाठी आत्ता युवकांनी पुढे येऊन निवडणुक लढवून भोंगळ कारभार करणाऱ्या भाजपला त्यांची जागा दाखवून द्यावी, आज अनेक नवीन युवक काँग्रेस पक्षाशी जोडले जात आहेत. कार्यकर्त्यांना बळ देणार असून शहर दक्षिण मधुन विधानसभा मतदारसंघातुन जास्तीत जास्त काँग्रेसचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी या युवक मेळावा प्रसंगी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here