सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने *महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, केंद्रातील मोदी सरकार निर्मित पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढ व महागाई विरोधात महागाईमुक्त भारतासाठी निदर्शने आंदोलन बुधवार दि. 06/4/2022 रोजी सकाळी 11:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.
तरी काँग्रेस पक्षाच्या सर्व जेष्ठ नेतेमंडळी, आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, सर्व फ्रंटल सेल अध्यक्ष, ब्लॉक, महिला कॉंग्रेस, युवक कॉंग्रेस, विद्यार्थी कॉंग्रेस, अल्पसंख्यांक विभाग, अनुसूचित जाती जमाती विभाग, भटक्या विमुक्त विभाग, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस भवन सोलापूर येथे उपस्थित राहावे.