सोलापुरात माजी महापौर मनोहर सपाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; हे आहे कारण

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापुरात माजी महापौर मनोहर सपाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; हे आहे कारण

सोलापूर // प्रतिनिधी

सोलापुरात काल एका माजी नगरसेविकेविरुद्ध घरकुल प्रकरणात कोट्यवधींचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला तर आज बुधवारी दुपारी सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर मनोहर गणपत सपाटे यांच्याविरुद्ध खोटे,बोगस व बनावट कागदपत्रे तयार करून जागेची खरेदी करून शासनाची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
यात हकीकत अशी की, मनोहर गणपत सपाटे (रा. हॉटेल शिवपार्वती,लकी चौक )सोलापूर तसेच लता सुदाम जाधव रा. सोलापूर यांनी सन 1993 -94 या कालावधीमध्ये जमीन हडप करून भ्रष्टाचार केल्याची तक्रार फिर्यादी योगेश नागनाथ पवार (रा. अभिषेक पार्क )सोलापूर यांनी केली होती.

माजी महापौर मनोहर सपाटे यांनी महापौर पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर हेतूने आणि संगनमताने खोटे बोगस व बनावट कागदपत्र तयार करून अभिषेक नगर ,मुरारजी पेठ येथील Tp 4 फायनल plot नंबर 106 क्षेत्र 7863 चौरस मीटर या जमिनीची शासकीय किंमतीच्या 25% रक्कम भरल्याचे खोटे दाखवले, तसेच सदर जागेची खरेदी करून ती जागा ताब्यात घेतली. शासनाची करोडो रुपयांची जमीन हडप करून भ्रष्टाचार केला आहे असे फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले आहे.
सदर जागा खरेदी करताना संस्थेचे सदस्य नसताना खरेदी खतावर संस्थेचे सचिव म्हणून लता सुदाम जाधव यांनी सही करून संशयित आरोपी माजी महापौर मनोहर सपाटे यांना गैर कारभारात मदत केली म्हणून सदर बाजार पोलीस ठाणे मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक कविता मुसळे अँटी करप्शन ब्युरो या करीत आहेत.
या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here