सोलापुरातील ठेकेदारी बुट्टी कारखान्याची सहाय्यक कामगार आयुक्त तपासणी करणार. – विष्णु कारमपुरी (महाराज)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापुरात बेकायदेशीर ठेकेदारी विडी कारखाने बुट्टी कारखाने मोठ्या प्रमाणात असुन या बुट्टी कारखान्यात प्रदुषण , धुम्रपान , कामगार कायदे असे कुठलेही नियम पाळले जात नाही . त्याच बरोबर अत्यंत कमी मजुरीने महिला विडी कामगारांकडून काम करून घेतात . अशा अनेक गैर प्रकाराबाबत सहाय्यक कामगार आयुक्त सदर कारखाने तपासणी करणार असल्याचे महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज) यांनी प्रसिध्दीस दिली आहे .
सोलापुरात मोठ्या प्रमाणात महिला विडी कामगारांची संख्या असून सदर विडी कामगारांना पुरेसे काम मिळत नाही . म्हणून गरीब कामगार वर्ग विडी वळण्या व्यतिरिक्त मिळेल ते काम करून कुटुंबाचे गुजराणा करतात याचा फायदा घेऊन सोलापुरात काही छोटे विडी कारखानदार बेकायदेशीर बुट्टी कारखाने चालवितात या कामगारांना तुटपुंजी मजुरी देणे धुम्रपान कायद्याचे नियम न पाळणे , विड्या भाजण्याचे भट्टी करून प्रदुषण पसरविणे अपुऱ्या जागेत असंख्य कामगारांना कच्चा माल देणे व घेणे डुबलीकेट कंपनीचे लेवल लावून बाजारात माल विकणे व इतर अनेक बेकायदेशीर प्रकार या बुट्टी कारखान्यात चालतात म्हणून सदर बुट्टी कारखान्यांची तपासणी करावी अशी मागणी शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे करण्यात आली . त्यावरून सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांनी या बेकायदेशीर ( बुट्टी कारखाने ) तपासणी करण्यासाठी पुणे विभागीय अप्पर कामगार आयुक्त यांच्याकडे परवानगी आयुक्त हे शहरातील बेकायदेशीर बुट्टी कारखान्यांची तपासणी करणार असल्याचे माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी दिली आहे .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here