सेवानिवृत्त घेतलेल्या पोलीस हवालदाराने घेतला सोलापुरात गळफास

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कारागृहात हवालदार पदावर काम केलेल्या कल्याण दगडू गावसाने यांनी सोलापुरात राहत्या घरी काल गुरूवारी (ता.9 ) सायंकाळी गळफास घेवून आत्महत्या केली.

असाध्य आजारानंतर उस्मानाबादहून गावसाने यांची नाशिकला बदली झाली होती. उपचारासाठी पैसे कमी पडत असल्यानं त्यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. मात्र त्यांचे शासकीय देय रक्कम त्यांना मिळालेली नव्हती. नाशिक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी पैसे घेवूनही हे काम करत नसल्यानं ते त्रस्त होते. यामुळंच त्यांनी आत्महत्या केली, अशी माहिती पत्नी आणि मुलानं प्रसारमाध्यमांशी बोलताना आज दिली. गावसाने यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला आहे.

कल्याण गावसाने यांनी सोलापुरातील माशाळ वस्ती येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ते नाशिक कारागृहात कार्यरत होते. गावसाने यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहातून स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. सेवा निवृत्तीनंतर दिल्या जाणाऱ्या पेन्शनसाठी कारागृह प्रशासनाकडून मानसिक त्रास दिला जात असल्यानेच त्यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप मृत हवालदाराच्या कुटुंबीयांनी केला आहे.

कल्याण गावसाने यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर कारागृह प्रशासनाकडून त्यांना पेन्शनसाठी मानसिक त्रास दिला जात होता त्यामुळे या आत्महत्ये प्रकरणी नाशिक मध्यवर्ती कारागृहातील आवारे मॅडम आणि गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा गावसाने कुटुंबीयांनी प्रशासनाला दिला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here