सुधारित मोटार वाहन अधिनियमाची अंमलबजावणी सुरू

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर दि. 15(जिमाका): महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन सुधारणा अधिनियम 2019 ची अंमलबजावणी करण्यात अधिसुचना महाराष्ट्र शासन गृह परिवहन विभाग अधिसुचना  दिनांक 1 डिसेंबर 2021 काढली असून सुधारित अधिनियमानुसार ई-चलन प्रणालीमध्ये दंड रक्कम  ही दिनांक 11 डिसेंबर 2021 काढली असून सुधारित अधिनियमानुसार ई-चलान प्रणालीमध्ये दंड रक्कम ही दिनांक 11 डिसेंबर 2021 रोजी मध्ये रात्रीपासून अद्यावत करण्यात आलेली असल्याने मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम 2019 नुसार कार्यवाही करणेबाबत अपर पोलीस महासंचालक (वाह) म.रा.मुंबई यांनी दिनांक 11 डिसेंबर 2021 च्या पत्रानुसार आदेश दिलेले आहेत.

 तरी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व वाहन धारकांना आवाहन करण्यात येते की, मोटार वाहन सुधारणा अधिनियम 2019 ची अंमलबजावणी दिनांक 11 डिसेंबर 2021 रोजी मध्य रात्रीपासून सुरु झालेली असुन वाहतुक गुन्ह्याच्या दंडात वाढ झालेली आहे, त्यामुळे नवीन नियमांनुसार दंड आकारण्यात येणार आहे. रस्ते अपघातातील जखमी व मृतांची संख्या कमी करण्यासाठी वाहतुक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखा सोलापुर ग्रामीणचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here