सीना-भोगावती जोड कालव्यासाठी प्रयत्नशील आहे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(सीना भीमा नीरा भोगावती नागझरी व बोरी नद्यांवर घाटणे बाॅरेज प्रमाणे बाॅरेज बांधावेत:-उमेश दादा पाटील)

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

जिल्ह्यात दिवसेंदिवस पाण्याची वाढती मागणी विचारात घेता अनगर परिसराला सीना-माढाचा लाभ द्या, सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या येत्या काळात घाटणे बॅरेजप्रमाणे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांवर बेरेज बांधणे आवश्यक आहे. लातूर जिल्ह्यात मांजरा नदीवर ज्या पद्धतीने बॅरेज बांधण्यात आले आहेत, त्याच धर्तीवर सोलापूर जिल्ह्यातील भीमा, सीना, नीरा, भोगावती, नागझरी, बोरी या नद्यांवर बॅरेज बांधावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

वितरिकेतून वाफळे (ता. मोहोळ) येथील ओढ्यात पाणी आणता येते. या संदर्भात यापूर्वीही चर्चा झाली आहे. सीना-माढाचे पाणी वाफळे परिसरात आणून या पाण्याचा लाभ अनगर व परिसरातील वाड्यांना होईल. त्यासाठी आपण जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची माहितीही जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश दादा पाटील यांनी दिली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here