सिव्हील हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करा जिल्हा प्रशासनाचे आवाहन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर,दि.17(जिमाका): जिल्ह्यात श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सिव्हील हॉस्पिटल ही एकमेव शासकीस संस्था आहे. याठिकाणी जिल्ह्यासह मराठवाडा व कर्नाटक येथील गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा दिली जाते. सिव्हील हॉस्पिटल रक्तपेढीमध्ये रक्ताचा मुबलक साठा असणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी शासकीय आणि खाजगी संस्था, रक्तपेढ्या यांनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

             सिव्हील हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया, अपघात झालेले रुग्ण व गरोदर माता, रक्त संक्रमित असलेले रुग्ण (ॲनिमिया, थॅलेसिमीया, हिमोफिलीया व सिकलसेल ॲनिमिया) यांना मोफत रक्त पुरविले जाते. सध्या ओमिक्रॉन व कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोव्हीड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. सिव्हील हॉस्पिटल रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबीरे होत नाहीत. मात्र खाजगी रक्तकेंद्रामध्ये रक्तदान शिबीरांचे आयोजन होत असल्याने त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात रक्ताचा साठा उपलब्ध आहे.

             रक्तसाठा कमी असल्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथील रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक रक्तदाते, स्वयंसेवी संस्था, मंडळ यांनी आपली नावे श्री छत्रपती महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथील कायमस्वरूपी रकतपेढीमध्ये नोंदवावीत, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here