सिताराम साखर कारखान्याकडुन २००/-रू हप्ता जाहीर (१५ दिवसांचा बोनस कामगारांच्या खात्यामध्ये वर्ग)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सिताराम महाराज साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांनी मागील वर्षी गाळपास आलेल्या ऊसाला दिवाळी सणासाठी २०० रुपये खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी गायकवाड यांनी गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी दिली . खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखान्याचा १२ गळीत हंगामाचा शुभारंभ ह.भ .प .जयवंत महाराज बोधले यांच्या शुभहस्ते पार पडला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर येथील मनोरमा सहकारी बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे होते.

यावेळी सिताराम साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक शिवाजीराव काळुंगे. सिताराम व धनश्री मल्टीस्टेटच्या चेअरमन शोभा काळुंगे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक समाधान काळे. सांगोला तालुका शेतकरी सूतगिरणीचे चेअरमन नानासाहेब लिगाडे. श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील .व्हाईस चेअरमन तानाजी खरात .सद्गुरु साखर कारखान्याचे राजेवाडी चे चेअरमन एन शेषगिरीराव. डॉ बी.एस. माने. जनकल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन राजेंद्र हजारे. अविनाश पाटील. उद्धव बागल . शिवव्याख्याते.प्रा. मारुती जाधव . डॉ रविराज गायकवाड. लेखापरीक्षक दिपाली पाटील. अभिजीत मुदगुल .पांडुरंग गोरे सर. सदानंद हजारे. माजी नगरसेवक अजित जगताप.सुयोग गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत गळीत हंगामाचा शुभारंभ पार पडला.

गाळप हंगाम २०२२-२३ मध्ये साडेपाच लाख मे.टन उसाचे गाळपाचे उद्दिष्ट असून दहा मेगावॅट सहविजनिर्मिती प्रकल्पातून तीन कोटी युनिट वीज एक्सपोर्ट केली जाणार असून पुढील वर्षी कारखाने मध्ये शेतकऱ्यांना जास्त दर देण्यासाठी प्रकल्प ची उभारणी करणार आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना उसाच्या बिलाची रक्कम तोडणी वाहतूक कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर पूर्ण केला असून त्यांच्या विश्वासात कारखाना पात्र असल्याचे सांगितले. कारखान्यातील कामगारांची दिवाळी गोड होण्यासाठी १५ दिवसाचा बोनस देणार असल्याचे यावेळी सांगितले.

यावेळी ह भ प जयवंत्त महाराज बोधले. मनोरमा सहकारी बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे संचालक समाधान काळे यांनी आपले विचार व्यक्त करून सुरू होणाऱ्या गळीत हंगामात शुभेच्छा व्यक्त केल्या.

या कार्यक्रमास सर्व विभागातील खाते प्रमुख, कर्मचारी, कामगार पंढरपूर – मंगळवेढा – सांगोला येथील शेतकरी, वाहन मालक, उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार जनरल मॅनेजर हणमंतराव पाटील यांनी मांडले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here