साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मनसेच्या वतीने साडी आणि अन्नधान्य वाटप!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने पंढरपूर शहरातील
विविध भागातील महिलांना साडी वाटप केले. यासह गहू, तांदूळ, गुळ, डाळ, तेल ,आणि साड्यांचे वाटप करण्यात आले .

शाळा क्रमांक 9 संत पेठ, आणि सांगोला चौक आणि अंबाबाई पटांगण परिसरातील रामबाग जवळ आणि इतर भागातही वरील साहित्याचे वाटप करण्यात आले.
माता-भगिनींना जीवनावश्यक वस्तू कार्यक्रम वेळी
मनसे व्यापारी सेलचे अध्यक्ष जयवंत भोसले ,मनसे शहराध्यक्ष संतोष कवडे, पत्रकार अभिराज उबाळे, विभाग अध्यक्ष नागेश इंगोले, उप शहराध्यक्ष सागर घोडके, आकाश बंदपट्टे ,सुरज देवकर, सचिन सुतार ,नितीन काळे,नगरसेवक कृष्णा वाघमारे ,अमित अवघडे ,शैलेश आगावणे, किरण अवघडे, भोला वाघमारे ,विठ्ठल वाघमारे, सुरज वाघमारे, सागर कांबळे इत्यादी उपस्थित होते.

चौकट

मनसेकडून मदतीची परंपरा सुरूच

मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी मागील दोन वर्षांपासून मागेल त्याला मदत ही पद्धत सुरु आहें. कोरोना कालावधीत तर हजारो कुटुंबियांना अन्नधान्य देऊन अडचणीच्या काळात मदत केली होती. विविध घटकांतील लोकांना वीज बिल भरण्यास रोख पैसे दिले होते. कोरोनाच्या कालावधीत महिलांना बचत गट च्या कार्यालयकढून होणारा त्रास होऊ नये यासाठी महिलांसाठी मोठं आंदोलन उभा करीत फार मोठा दिलासा दिला होता. वरील सर्व गोष्टी विचारात घेता दिलीप धोत्रे यांचे नाव आता पंढरीतील घराघरात पोहचले असल्याचे दिसून येत आहें.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here