सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या कामगारांना मोफत कोरोना लस

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या कामगारांना मोफत कोरोना लस

सोलापुर // प्रतिनिधी

भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.कल्याणराव काळे यांच्या शुभहस्ते कोविड लसीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी वसंतदादा मेडीकल फौंडेशन संचलित जनकल्याण हॉस्पिटल,पंढरपूर व कामगार कल्याण मंडळ यांच्या मार्फत कारखान्याचया कामगारांना कोवि शिल्डचा पहिला डोस मोफत देण्यात आला. वसंतदादा मेडीकल फौंडेशनचे संस्थापक डॉ.सुधीर शिनगारे,कारखान्याचे मेडीकल ऑफिसर सौ.जयश्री शिनगारे व जनकल्याण हॉस्पिटलचा सर्व स्टाफ उपस्थित होते.

या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन श्री.काळेसाहेब यांनी सध्या सोलापूर जिल्यासह पंढरपूर तालुक्यामध्ये कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव, अपुरा लसीचा पुरवठा, शासकीय रुग्णालयात आणी खाजगी रुग्णालयात लस घेण्यासाठी होणारी अफाट गर्दी  यांचा विचार करुन कारखान्याचे कामगार व त्यांचे कुटुंबियांचे संरक्षण व्हावे या साठी कामगारांना कारखाना कार्यस्थळावरच पहिली मोफत लस देण्याचे नियोजन करुन आज सुरुवातीस कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे यांचेसह पहिल्या टप्यात 125 कामगारांना मोफत लसीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्यात लस उपलब्ध होताच टाईम विभागाकडे नोंदणी केलेल्या कामगारांना लस देण्यात येणार असून, कारखान्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना मोफत लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे यावेळी सांगीतले.

यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक, खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, कर्मचारी व कामगार उपस्थित होते. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here