सहकार शिरामणी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची सांगता!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सहकार शिरामणी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची सांगता!

 

पंढरपुर तालूक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यांच्या सिझन २०२१-२०२२ या गळीत हंगामाची सागता शनिवार दिनांक २६/३/२०२२ रोजी झाली. सदर कार्यक्रमासाठी कारखान्याचे संचालक श्री. तानाजी उमराव सरदार व त्यांचे सुविद्य पत्नी सौ. राजश्रीताई या उभयंताचे हस्ते काटापुजन व श्री सत्यनारायण महापुजा करण्यात आली. प्रथम श्री विठ्ठल व वसंतदादा काळे यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कारखान्यांचे चेअरमन कल्याणराव काळे होते.

प्रास्ताविक भाषणात कार्यकारी संचालक झुंजार आसबे म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळेसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली सन २०२१-२२ चा गळीत हंगाम यशस्वीपणे सपन्न करण्यात आला. कारखान्याने १४५ दिवसामध्ये ४,३४.९९७ मे. टन ऊसाचे गळीत झाले असून, सरासरी ९.७४% साखर उता-याने एकूण ४२२१३० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. हंगामात डिस्लरी व कोजनरेजन प्रकल्प पूर्ण क्षमतेने चाललेले असून, १३० दिवात डिस्लरीमध्ये ४४,१८,०१९ बल्क लिटर उपपदार्थाचे उत्पादन झाले आहे. १८ मे.वॅट वीज प्रकल्पातून २,७१,७२,३०० युनिट बीज निमिर्ती झालेली असून, १,२५,७०,००० युनिट वीज महावितरणला निर्यात करण्यात आलेली आहे. कारखान्याचे संचालक, ऊस पुरवठादार, ऊस तोडणी/वाहतुक मजूर कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व कामगारांचे सांधिक प्रयत्नातून हा हंगाम यशस्वी झाला असलेचे सांगून श्री. झुंजार आसबे यांनी पुढील हंगाम पूर्ण क्षमतेने चालवून ६,००,००० मे.टन ऊसाचे गाळप करणार असल्याचे सांगितले,

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व संचालक तानाजी सरदार यांनी हंगाम सिझनमध्ये कारखान्यास ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या अडीअडचणीचा सविस्तर अभ्याष करून, पुढील हंगाम कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही यांची प्रशासनाने व शेती विभागाने दक्षता घ्यावी.

याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी कारखाना सिझन हा अनेक आर्थिक अडचणींना तोड देवून यशस्वीपणे पार पाडला त्याबदल कारखान्याचे संचालक, ऊस पुरवठादार, ऊस तोडणी/वाहतुक मजूर, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींचे अभिनंदन केले. कारखाना सिझन चालु करणे करीता महाराष्ट्राशासनाने आपले कारखान्यास १८.०० कोटी थक हमी दिल बददल मा. ना. श्री. शरदचंद्रजी पवारसो, मा. कृषी मंत्री, भारत सरकार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना. श्री. उध्दवजी ठाकरेसो, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवारसो, सहकार मंत्री मा. ना. श्री. बाळासाहेब पाटीलसो यांनी मोलाचे सहकार्य केले, त्याबददल सर्वांचे ऋणी आहे. हंगाम २०२२-२३ मध्ये मशिनरी आधुनिकीकरण करुन प्रति दिन ४००० ते ४२०० मे.टन गाळप करण्याचे मा. संचालक मंडळाचे उदिष्ट आहे. तसेच कारखान्याने गुढी पाडव्यानिमित्त ऊस उत्पादक सभासद/बिगर सभासद यांना सवलतीच्या दरात दि. २५/०३/२०२२ पासून कारखाना कार्यस्थळावर व पंढरपूर येथील प्रतिभादेवी नागरी पतसंस्था येथे साखर विक्री चालु केली असलेच सांगितले.

कारखाना सिझनमध्ये सन २०२१-२२ मध्ये गळीत हंगामात जादा ऊस वाहतुक केलेल्या बैलगाडीवानांचा सत्कार कारखान्याच्या संचालकांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रथम क्रमाक बैलगाडीवान नवनाथ विठ्ठल सानप, व्दितीय क्रमाक राहूल रामकिसन खाडे व तृतीय क्रमाक भाऊसाहेब जालींदर खटके यांना रोख रक्कम देवून गौरव करण्यात आला.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन राजेंद्र शिंदे.मा.व्हा.चेअरमन मारतीदादा भोसले संचालक मोहन नागटिळक, भारत कोळेकर, आण्णा शिंदे, दिनकर कदम, दिनकर चव्हाण, युवराज दगडे, इब्राहीम मुजावर, नागेश फाटे, बिभीषण पवार, योगेश ताड, राजाराम पाटील, बाळासाहेब कौलगे, गोरख जाधव, विलास जगदाळे, प्रदिप निर्मळ, आरूण बागल, सुधाकर कवडे, प्रतिभा पतसंस्थेचे चेअरमन विष्णु चलमार, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, विविध संस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कारखान्याचे खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक सभासद शेतकरी, सप्नायर्स, कंत्राटदार,ट्रक/ट्रॅक्टर मालक, हितचिंतक आदि मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रावसाहेब पवार व आभार पी. डी. घोगरे यांनी मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here