सहकारतपस्वी स्व.सुधाकरपंत परिचारक यांचा वारसा कायम

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(आमदार प्रशांत मालक परिचारक यांनी जाहीर केला २६००रू.देण्याचा निर्णय)

(सर्व सभासद शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण)

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पेपर पि देणारा पांडुरंग कारखाना ठरला आहे चालू गळीत हंगामात येणारे उसाला 2600 रुपये प्रति टन देण्याचे जाहीर पांडुरंग कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी 31 व्या गळीत हंगामात समारंभात बोलताना सांगितले पांडुरंग कारखान्याच्या 31 व्या गळीत हंगामात गव्हाणीत मोळी टाकून गाळपास सुरुवात केली त्यावेळी पंढरपूर-मंगळवेढा आमदार समाधान अवताडे, विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत, माळशिरस आमदार राजाभाऊ सातपुते, युटोपियन चे चेअरमन उमेश परिचारक, पांडुरंग कारखान्याचे व्हाईस चेअरमन वसंतराव देशमुख, दिनकर मोरे, दिलीप चव्हाण, दाजी पाटील, कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी काळजी संचालक मंडळ ऊस उत्पादक सभासद अधिकारी कामगार आदी उपस्थित होते.

गतवर्षी कारखान्याची दहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 11.41 टक्के सर्वाधिक साखर उतारा काढला आहे चालू वर्षी उसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे कारखान्याकडे 16 लाख मेट्रिक टन उसाची नोंद झाली आहे त्यामध्ये आडसाली व खोडवा याची नोंद मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लवकरात लवकर उसाचे गाळप होण्याची तोडणी प्रोग्रामचे नियोजित काटेकोर पद्धतीने केली आहे कारखान्याकडे सात लाख मेट्रिक टन आडसाली ऊस आहे संपूर्ण उसाचे गाळप करण्यासाठी जवळपास शंभर दिवस लागतात त्यासाठी संचालक मंडळाने व व्यवस्थापनाने नव्वद दिवस आडसाली 90 दिवस खोडवा निडवा गाळप करण्याचे नियोजन केले आहे चालू हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संपूर्ण ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here