सर्व शेतकऱ्यांना आधुनिक व शास्त्रशुद्ध तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन:-कल्याणराव काळे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

चंद्रभागानगर भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साखर कारखाना लि,चंद्रभागानगर, याकारखान्याचे वतीने ऊसामधील आधुनिक, शास्त्रशुध्द ऊस शेतीच्या तंत्रज्ञानाची व उजनी कॅनॉलवर आपले हक्काचे पाणी आपणास मिळणेसाठी जास्तीत-जास्त पाणी वापर संस्था स्थापन करणे याव इतर विषयावर भव्य शेतकरी मेळावा शनिवार दि.05/03/2022 रोजी दुपारी 2 : 00 वाजता, माती परिक्षण प्रयोगशाळा मौजे-धोंडेवाडी येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे यांनी दिली.

या शेतकरी मेळाव्याचे प्रमुख व्याख्याते मा.श्री.सोमशेखर हरसुरे, कार्यकारी अभियंता ,भिमा पाटबंधारे विभाग,पंढरपूर हे उजनी कॅनॉलवर पाणी वापर संस्था स्थापन करणेचे महत्व्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत व मा.श्री.सुनिल चौगुले उपविभागीय अभियंता, भिमा पाटबंधारे विभाग,पंढरपूर हे शेतक-यांनी पाणी मागणी अर्ज नाही दिले, तर शेतीवर होणारे पिरणाम याबाबतची माहिती, तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट या संस्थेने सन्मानित केलेले ऊस भुषण पुरस्कार विजेते नारायण धोंडिबा भगत, रा.महाळुंग, ता.माळशिरस, जि.सोलापूर, आधुनिक व शास्त्रशुध्द ऊस शेतीचे तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन करणार आहेत
तरी ऊस उत्पादक सभासद, शेतकरी बंधुनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहून शेती विषयक ज्ञानाचा लाभ घेवुन, उजनी कॅनॉलवर जास्तीत-जास्त पाणी वापर संस्था स्थापन करणेचे दृष्टीने सहकार्य करणेचे आवाहन कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here