सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन दिवसात मदत न मिळाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करणार:दिलीप धोत्रे सोलापूर जिल्ह्यात प्रथमच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन दिवसात मदत न मिळाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करणार:दिलीप धोत्रे

सोलापूर जिल्ह्यात प्रथमच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील अनवली व कासेगाव भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी नुकसान झालेल्या शेतमालाची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मनसेकडून शेताच्या बांधावरच धनादेश देऊन आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी मनसे कडून राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना फळबागांसाठी एकरी तीन लाख रुपयांची तसेच इतर शेतमालासाठी एकरी सरासरी एक लाखाच्या पुढे मदत करावी अशी मागणी धोत्रे यांनी यावेळी केली .तर विमा कंपन्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित पिक विमा भरपाई न दिल्यास विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही व विमा कंपन्यांच्या ऑफिसमध्ये मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल दिला असा इशारा दिला आहे.
याप्रसंगी धोत्रे यांनी सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना फोन करून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावेत अशी मागणी केली परंतु 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला असेल तरच त्या भागाचे पंचनामे होतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगताच धोत्रे चांगले आक्रमक झाले. राज्यामध्ये शेतकऱ्यांचा कळवळा घेऊन सत्तेवर आलेले तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे या सरकारमधल्या नेत्यांनी व मंत्र्यांनी कुठल्याही अटी शर्ती चे बंधन न घालता नुकसानग्रस्त भागाचे सरसकट पंचनामे करावेत. केंद्र सरकारने ही यात पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी. राज्यातील महाविकास आघाडी सरकार व केंद्रातील भाजप सरकार हे शेतकऱ्यांना केवळ भूलथापा देऊन उल्लू बनवत आहे. मात्र आता शेतकऱ्यांना या सरकारचा ढोंगीपणा शेतकरी, कष्टकरी,सामान्य जनता, कामगार सर्वांनाच दिसून आला आहे. त्यामुळे राज्यात ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस झाला असेल त्या सर्व ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरू करून शेतकऱ्यांना दोन दिवसाच्या आत शासनाने सरसकट मदत जाहीर करावी अन्यथा राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरात महाविकासआघाडी, केंद्रातील भाजप सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल व याचे परिणाम नक्कीच केंद्रासह राज्यातील महा विकास आघाडी सरकारला भोगावे लागेल असा इशारा मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी याप्रसंगी दिला.

यावेळी मनसे तालुका अध्यक्ष शशीकांत पाटील, उपजिल्हा अध्यक्ष दिलिप पाचंगे, शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गारड,विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, सहकार सेना अध्यक्ष कृष्णा मासाळ,व्यापार उद्योग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष जयवंत भोसले, समाजसेवक संतोष कवडे, शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष महादेव मांढरे, उपतालुका अध्यक्ष दीपक भोसले,युवराज पतसंस्थेचे चेअरमन उमेश सासवडकर,उपशहर अध्यक्ष महेश पवार, गणेश पिंपलनेरकर,नागेश इंगोले, बाबा ननवरे,लखन घाडगे, अवधूत गडकरी, प्रथमेश धुमाळ, विकी चव्हाण, तेजस गांजले, वैभव इंगोले, हनुमंत वाघमारे,इत्यादी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here