समाजाचा विश्वास संपादन होईल असच सामाजिक कार्य करा: प्रा.सुभाष वायदंडे (कोणत्याही समाजाबरोबर प्रतारणा करू नका:- कार्यकर्त्यांना दिला वायदंडे सरांनी सबुरीचा सल्ला)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

समाजामध्ये सामाजिक काम करत असताना राजकीय रंगापासून लांब राहून काम करा:प्रा सुभाष वायदंडे

(कोणत्याही समाजाबरोबर प्रतारणा करू नका:- कार्यकर्त्यांना दिला वायदंडे सरांनी सबुरीचा सल्ला)

सामाजिक कार्य करत असताना राजकीय रंगापासून लांब राहून वेळेचं भान न ठेवता समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या बाबतीत एकनिष्ठ राहून काम करा; जेणेकरून समाजाचा तुमच्यावर विश्वास बसला पाहिजे सामाजिक कार्याचा वापर राजकारणासाठी करून समाजांबरोबर प्रतारणा करू नका असा सबुरीचा सल्ला पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे यांनी दिले. ते पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सोलापूर युवक जिल्हाअध्यक्षपदी भरत कदम यांचे निवडी प्रसंगी घरनिकी येथे बोलत होते.
यावेळी प्रमुख उपस्थितीत सोलापूर जिल्ह्याचे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष कृष्णा गायकवाड होते.
जिल्हाध्यक्ष कृष्णा गायकवाड यांच्या शिफारशीनंतर भारत कदम यांना प्रा. सुभाष वायदंडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विष्णू गायकवाड, सिताराम गायकवाड, सुभाष वाघमारे, सागर कदम, समाधान कदम, नितीन कांबळे, सुनील ताकतोडे, बाळू गायकवाड इत्यादी मोहोळ तालुक्यातील पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सोलापूर युवक जिल्हाध्यक्षपदी निवडीनंतर भारत कदम यांचा सत्कार करताना राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे जिल्हाध्यक्ष कृष्णा गायकवाड,विष्णू गायकवाड मान्यवर उपस्थित आहेत.

चौकट

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सोलापूर युवक जिल्हाध्यक्षपदी निवडीनंतर भारत कदम यांचा सत्कार करताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष कृष्णाजी गायकवाड,विष्णू गायकवाड मान्यवर उपस्थित आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here