सधन कुक्कुट विकास गटासाठी अर्ज करा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर दि. 25 (जिमाका) :- जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा या तीन तालुक्यातून सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे या योजनेसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सोलापूर कार्यालयामार्फत सन 2021-22 करीता योजना राबविण्यासाठी सन 2017 – 18 अंतर्गत 50 टक्के अनुदानावर पशुपालक लाभार्थ्यांची सर्व प्रवर्गातून प्रति तालुका 1 या प्रमाणे लाभार्थी निवड करण्यात येणार आहे. एकूण प्रकल्प किंमत रूपये 10,27,500/- पैकी सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान म्हणजेच रूपये 5,13,750/- शासनाचे अनुदान देय असून उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थी स्वत:चा हिस्सा किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभा करू शकतील.

            इच्छुक लाभार्थींनी संबंधित पंचायत समिती येथील पशुधन विकास अधिकारी (वि) लगतच्या तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्यालय / पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी – ½ यांचेशी संपर्क साधून विहित अर्जाचा नमुना प्राप्त करून घेऊन परिपूर्ण अर्ज संबंधित पंचायत समितीमध्ये पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांचेकडे दिनांक 24 ते 31 जानेवारी 2022 अखेर सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सोलापूर यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here