सद्गुरु साखर कारखाना एफ आर पी पेक्षा जादा दर देवुन सभासदांची दिवळी करणार गोड- चेअरमन एन. शेषागिरीराव

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(सभासद शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड ऊसाला एफ.आर.पी पेक्षा वाढीव दरानुसार जादा 100 रुपये म्हणजे एकुण 2600 रुपये प्रती मेट्रिक टनानुसार देणार)

महाराष्ट्र शासन साखर आयुक्त जा. क्र.आ/ऊस7/अर्थ 1/FRP-22 दि.17/3/2022 नुसार कारखान्याच्या चालु एफ आरपी नुसार दर देण्याचे आदेश साखर आयुक्त कार्यालय पुणे यांनी दिले त्यानुसार सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याची 2021-2022 गत हंगामातील एफआरपी रक्कम 11.08 %साखर उतार्यानुसार रुपये 2437 प्रती मेट्रिक टन प्रमाणे सभासदांच्या खात्यात सद्गुरु ने जमा केले आहे.

सभासदांची दिवाळी गोड व्हावी याकरिता सद्गुरु ने 15/3/2022 पर्यत गळीतास आलेल्या ऊसाला एफ आरपी पेक्षा जादा 63 रुपये म्हणजे एकुण 2500 रुपये प्रती टन देणार आहेत तर 16/3/2022 ते 31/3/2022 दरम्यान गाळपास आलेल्या ऊसाला वाढीव दर जाहीर केल्याप्रमाणे जादा 40 रुपये म्हणजे एकुण 2540 रुपये प्रती टन देणार, 1/4/2022 ते 15/4/2022 दरम्यान गाळपास आलेल्या ऊसाला जाहीर केलेल्या वाढीव दरानुसार जादा 75 रुपये म्हणजे एकुण 2575 रुपये,16/4/2022 नंतर हंगाम संपेपर्यत आलेल्या ऊसाला जाहीर केलेल्या वाढीव दरानुसार जादा 100 रुपये म्हणजे एकुण 2600 रुपये प्रती मेट्रिक टनानुसार जादा देणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन एन शेषागिरी राव यांनी सांगितले
गत हंगामात अतिरिक्त ऊस असताना ऊस गाळप होईल की नाही म्हणून शेतकरी प्रचंड ताण तणावात होता यावेळी भर उन्हा ताणात चेअरमन शेतकर्याच्या भेटी घेऊन सभासदाचा संपुर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद करणार नसल्याचे बैठका घेऊन सांगत होते.

आसपासचे सर्व कारखाने बंद झाले परंतु सद्गुरु ने एक ते दोन पाळीत कारखाना चालवुन आर्थिक तोटा सहन करत सर्व ऊस गाळप केला. फेब्रुवारी महिनाखेर आदिवासी भागातील ऊस कामगार होळी सणासाठी गावी निघुन गेले तरी सुद्धा पर राज्यातुन तोडणी यंत्रणा आणुन व हार्वेस्टिंग यंत्रणा वापरुन सभासदांचा ऊस स्वत च्या हमीवर इतर कारखान्यांना वळविला व ते बील सद्गुरु ने स्वत शेतकर्याच्या खात्यात जमा केला.

गत हंगामात प्रचंड प्रमाणात जळीत ऊस गाळपास आला व परिणामी साखर उतार्यात घट झाली त्यामुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे मशिनिरी दुरुस्ती खर्च सद्गुरु ला मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला वेळ प्रसंगी एक एक दिवस कारखाना बंद ठेवु मशिनिरी दुरुस्ती केल्या व सभासदांच्या रानात सद्गुरु ने टिपरु ही शिल्लक ठेवले नाही. वेळप्रसंगी तोडणी यंत्रणा कमी पडत असताना शेती विभागाने प्रती टन चारशे रुपये जादा दर देवुन ऊस तोडणी करुन सभासदांचा संपुर्ण ऊस गाळपास आणला.सद्गुरु श्री श्री साखर कारखान्यामुळे दुष्काळी माण,सांगोला,आटपाडी या तालुक्यांना उभारी आली असुन राजकीय सुड बुद्धीने काही मंडळी नाहक कारखान्याची बदणामी करत आहेत.

या भागातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने सद्गुरु ने बिल दिले असुन सद्गुरु कारखाना कुठेही कमी नाही परंतु केवळ आध्यात्मिक विचारसणीच्या शिस्तप्रिय कारखान्यास अशी सत्वपरिक्षा का द्यावी लागते हीच चर्चा सद्या जाणकार मंडळींच्या तोंडुन येत आहे

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here