सत्ताधारी पक्षाचा अख्खा वेळ मॅनेजमेंट मध्ये – सुषमा अंधारे.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सत्ताधारी पक्षाकडे लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नसून त्यांचा अख्खा वेळ मॅनेजमेंट मध्ये जात असल्याची घानाघात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुखेड मध्ये महाप्रबोधन यात्रेदरम्यान आयोजित कार्यक्रमादरम्यान बोलताना केल्या यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेचा शिक्षणाचा दर्जा खालावत झाल्याचे ही सांगितले.
महा प्रबोधन यात्रेदरम्यान मुखेड मध्ये दिनांक 19 रोज रविवारी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित सभेमध्ये शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, बबनराव थोरात, शरद कोळी ,प्राची पाटील, बबनराव बारसे ,दशरथ लोहबंदे यासह अनेक नेते उपस्थित होते.
यावेळी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या भाषणाची सुरुवात फटाक्याच्या आतीषबाजीने करण्यात आली. यावेळी बोलताना अंधारे म्हणाल्या की, सत्ताधारी पक्षाचा अख्खा वेळ हा कोणाला इडी लावणे, कोणावर गुन्हे दाखल करणे याचा मॅनेजमेंट वर जात असुन जनसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष नसल्याचे सांगितले. अवकाळी पावसामुळे शेतीची अतोनात नुकसान झाले आहे रबीचा गहू, हरभरा, टरबूज यास आंब्याचा मोहोर सुद्धा गेला आहे. या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसल्यामुळे जनसामान्याचे प्रश्न ऐकण्यासाठी ही महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महिलांसाठी जे केलेले 50% तिकीट माफ हे करण्यापेक्षा गॅस चा दर कमी केला तर फायदा झाला असता अशी ही ते म्हणाले. जिल्हा परिषद च्या शाळेचा शिक्षणाचा दर्जा घसरल्याचे सांगितले. जिल्हा परिषद शाळेमध्ये चांगला व्यापारी, अधिकारी, नेते, जिल्हा परिषद शिक्षक व प्राध्यापकांची मुले शिक्षणासाठी प्रवेश घेत नाहीत. शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची गरज असल्याचे यावेळी म्हणाले. माजी आमदार सुभाष साबणे यांचा समाचार घेताना अंधारे म्हणाल्या की, एक वेळेस आत्महत्या करेन पण शिवसेना सोडणार नसल्याचे त्यांनी पत्रामध्ये लिहिले होते. येथील आमदार तुषार राठोड हे हुजरेगिरी करण्यामध्ये फीटमफाटफाट असल्याचेही म्हणाले.
आजची रॅली ही अवस्मरणीय रॅली होती. ही रॅली शिवसेनेच्या विजयाची रॅली आहे. शेवटच्या टप्प्यात महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. लोक आता सत्य स्वीकारू लागली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्न ऐकण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आभार माजी नगरसेवक राहुल लोहबंदे यांनी मानले. यावेळी तालुकाध्यक्ष नागनाथ लोखंडे, वसंत आना संबुटवाड, बालाजी बंडे, अनिल जाजू, शंकर पाटील लुटे, यासह शहर नेते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here