सखाराम बागल सर यांचे दु:खद निधन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
मुळचे गादेगाव येथील रहिवाशी व रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालय रोपळे ता.पंढरपूर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक सखाराम बागल  सर यांचे वयाच्या 61 व्या वर्षी दि.1 ऑगस्ट 2022 रोजी पुणे येथे उपचारादरम्यान दु:ख निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, एक विवाहित मुलगा, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांनी यापूर्वी श्रीनाथ विद्यालय बोरगांव ता.माळशिरस, हनुमान विद्या मंदिर मरवडे ता.मंगळवेढा, न्यू इंग्लिश स्कूल ढोरलेवाडी ता.बारामती जि.पुणे , न्यू इंग्लिश स्कूल गादेगाव ता.पंढरपूर येथे उपशिक्षक म्हणून सेवा बजावलेली आहे. ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या जाण्याने अनेकांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here