संसारातील दुःख निवृत्ती करून सुखप्राप्ती करिता संत संगती करा – शेटे महाराज

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(मा जी आमदार श्री हरीदास भाऊ भदे साहेब यांची भागवत कथेला सदिच्छा भेट)

पाचवे वाक पुष्प

अकोला – दत्त कॉलनी मध्ये गेल्या सहा दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून अकोला जिल्ह्यातील सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती कार्यक्रमाला लाभत आहे आज कथेला सदिच्छा भेट देण्याकरिता मा जी आमदार श्री हरिदास भाऊ भदे साहेब यांची उपस्थिती लाभली व श्री गणेश पाटील लांडे यांच्या हस्ते साहेबांचा सत्कार करण्यात आला
अखंड हरिनाम सप्ताह मध्ये दररोज सकाळी ह भ प श्री ज्ञानेश्वर महाराज नावकार यांच्या व्यासपीठ नेतृत्वा मध्ये श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करण्यात येत आहे व रात्री सात ते दहा वाजेपर्यंत विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष ह भ प श्री गणेश महाराज शेटे यांच्या रसाळ वाणीतून संगीतमय भागवत कथा सुरु आहे

भागवत कथेमध्ये पाचव्या दिवसाचे वाक पुष्प गुंफताना भागवताचार्य महाराजांनी सांगितले संसार हा दुःखमय आहे प्रत्येक मनुष्य हा दुःखाने होरपडलेला आहे आणि या दुःखातून बाहेर निघायचं असेल तर सुखाचा मार्ग फक्त परमार्थात आहे कारण सुख फक्त दोघांच्या जवळ आहे एक भगवंताजवळ ‘सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा/ माझ्या पांडुरंगा सारीखा तो//’ आणि दुसरं सुखाचं ठिकाण संत आहेत ‘सुख वसे हेचि ठायी/ बहु पायी संताच्या/’ म्हणून प्रत्येक जिवाने सुखप्राप्ती करिता भगवंताच्या व संताच्या जवळ जायला पाहिजे असे विचार भागवत कथेमध्ये श्री गणेश महाराज शेटे यांनी व्यक्त केले
कथेमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळेला भागवत कथा मंडपाला दिवाळीचे स्वरूप निर्माण झाले होते यावेळी अकोला शहरातील कानाकोपऱ्यातून भाविक या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत असून या अखंड हरिनाम सप्ताह मुळे परिसरातील वातावरण हे भक्तिमय निर्माण झालेले आहे
अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक श्री गणेश पाटील लांडे यांनी दिली

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here