संपूर्ण ऊस गाळप झाल्या शिवाय साखर कारखाने बंद करूनये:- आयुक्त शेखर गायकवाड

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(साखर आयुक्ताचे सर्व साखर कारखानदारांना पत्र)

यावर्षी राज्यातील बहुतेक जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळेच कार्यक्षेत्रातील नोंदणी असलेल्या व बिगर नोंदणीचा संपूर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय साखर कारखाने बंद करता येणार नाहीत असे आदेश राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्यातील कारखानदारांना दिले आहेत. राज्यातील इतर जिल्हा प्रमाणेच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याकडील ऊस या हंगामात साखर कारखान्यांपर्यंत पोहोचेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागच्या दोन वर्षापासून चांगला पाऊस झाला आणि त्यामुळे पाणी साठ्याचे सोर्स वाढले आणि त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये उसाची लागवड मराठवाड्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे.
तांत्रिक अडचणींमुळे बरेच साखर कारखाने हे खूप उशिरा सुरू झाले. त्यामुळेच त्या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस साखर कारखान्यापर्यंत गाळप बंद होईपर्यंत पोहोचेल का अशी चिंता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लागले आहे.बीड जिल्ह्यामध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न भेडसावत असतानाही अद्याप प्रशासनाकडून या संदर्भामध्ये कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. किमान शिल्लक राहिलेल्या उसाची माहिती घेऊन संबंधित साखर कारखान्याला प्रशासनाने कळवले तर कदाचित ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे नुकसान वाचवता येऊ शकते.
काय म्हटले आहे पत्रात..
15 ऑक्टोबर 2021 पासून गाळपाची परवानगी राज्यातील साखर कारखान्यांना दिली त्यानुसार 197 कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला.प्राथमिक अंदाजानुसार एकूण 12.32 लाख हेक्‍टर क्षेत्रावरील चालू हंगामात उस उपलब्ध आहेउस उत्पादक शेतकरी वंचित राहणार नाहीत याची सर्व साखर कारखान्यांनी दक्षता घ्यावी..एखाद्या साखर कारखान्याकडे अतिरिक्त ऊस शिल्लक राहत असल्यास नजीकच्या साखर कारखान्यांना अतिरिक्त होणारा संपूर्ण ऊस गाळप करण्याबाबत सुचवावे.
शासनाच्या ऊस नियंत्रण आदेशान्वये अधिकारांचा वापर करून राज्यातील सर्व प्रकारच्या साखर कारखान्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारच्या उसाचे काळात झाल्याशिवाय बंद करता येणार नाही..गाळप हंगाम बंद होण्याच्या पंधरा दिवस आधी स्थानिक वृत्तपत्रातून जाहीर प्रगटन द्यावेविनापरवानगी कारखाना बंद केल्यास आणि कार्यक्षेत्रातील ऊस गाळपाविना शिल्लक राहिला तर त्याची जबाबदारी ही साखर कारखान्यावर असेल आणि त्यावरती गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा साखर आयुक्तांनी दिला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here