संत दामाजी कारखाना कार्यस्थळावर राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय,सोलापूर यांचे सुचनेनुसार संत दामाजी साखर कारखाना कार्यस्थळावर शनिवार दि।४ मार्च २०२३ रोजी राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असुन सदर सप्ताह ४ मार्च ते ११ मार्च २०२३ अखेर चालणार असलेची माहिती कार्यकारी संचालक श्री।सुनिल दळवी यांनी दिली।
कारखान्याचे चेअरमन मा।श्री।शिवानंद पाटील, व्हाईस चेअरमन मा।श्री तानाजीभाऊ लक्ष्मण खरात व संचालक मंडळ यांनी दिप प्रज्वलन करुन औद्योगिक सुरक्षितता सप्ताहाचे उद्घाटन केले।  सदरच्या कार्यक्रमप्रसंगी श्री पुष्पदास रणनवरे, सेप्टी आùफिसर,सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना,शंकरनगर,अकलूज यांचे औद्योगिक सुरक्षा या विषयांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते।  सदर प्रसंगी श्री पुष्पदास रणनवरे यानी उपस्थित सर्वाना औद्योगिक सुरक्षीततेची शपथ दिली व पुढे म्हणाले कि, सन १९६६ पासुन औद्योगिक क्षेत्रामध्ये ४ मार्च हा सुरक्षा दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरले।  त्यानुसार साखर कारखानदारीमध्ये दिवसेिंदवस अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने १९७१ सालापासून दरवर्षी ४ मार्च ते ११ मार्च या दरम्यान सुरक्षा सप्ताह पाळण्यात येत आहे। काम करीत असताना कामगारांनी सुरक्षा साधनांचा वापर करणे गरजेचे आहे। कामाचे ठिकाणी मोबाईलचा वापर टाळावा, नवीन कामगारांना अपघाताविषयी माहिती देणे जुन्या कामगारांचे  काम असते। शक्य होईल  तेवढे अपघात टाळण्याचे  प्रयत्न कर्मचा-यांनी करुन सहका-यांनाही याबाबत माहिती देवून अपघात होणार नाहीत याची दक्षता घ्यावी। अपघात झाल्यास एखादा अवयव निकामी झाल्यास नुकसान भरपाई मिळते परंतु अवयव मिळत नाहीत असे शेवटी ते म्हणाले।  
सदर प्रसंगी व्याख्याते श्री पुष्पदास रणनवरे व गुणवंत कामगार पुरस्कार विजेते श्री गजानन पिसे यांचा कारखान्याचे वतीने सन्मान करण्यात आला।
याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन मा।श्री शिवानंद पाटील म्हणाले, कारखान्यात काम करीत असताना प्रत्येकाने आपली सुरक्षीतता जपली पाहिजे। कामगारांनी आपल्यामुळे इतर कामगारांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे।  काम करीत असताना मोबाईलचा वापर टाळणे गरजेचे आहे।  कारण लक्ष विचलीत होवून अपघात होण्याचा संभव असतो।  तसेच अशा प्रकारच्या औद्योगीक सुरक्षा सप्ताहाचे वारंवार आयोजन करुन कामगारांमध्ेय सुरक्षीतेविषयी प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे चेअरमन मा।श्री शिवानंद पाटील म्हणाले।
सदर कार्यक्रम प्रसंगी व्हाईस चेअरमन श्री तानाजीभाऊ खरात, संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकुल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणू पाटील,भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, प्रकाश पाटील, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, तसेच माजी संचालक जगदिश पाटील, मंगळवेढयाचे व्यापारी गुंडीबा दत्तू, फटेवाडीचे मिस्टर सरपंच प्रकाश काळुंगे,दामाजी हायस्कुलचे मुख्याध्यापक सुरेश  कोडग सर कार्यकारी संचालक श्री सुनिल दळवी, कारखान्याचे  विभागप्रमुख, कामगार, कामगार संघटनेचे तसेच कामगार पतसंस्थेचे पदाधिकारी, व परिसरातील सभासद शेतकरी उपस्थित होते।  
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री अशोक उन्हाळे यांनी केले तर आभार संचालक श्री गोपाळ भगरे यांनी मानले।

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here