संजय राऊत याना विश्रांतीची गरज आहे:-देवेंद्र फडणवीस

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भाजपला सतत जशास तसे उत्तर संजय राऊत यांनी दिल्यामुळे महाआघाडी सरकार टिकून आहे.हे उघड वास्तव आहे. शरद पवार अधूनमधून शाब्दिक टेकू लावण्याचा प्रयत्न करून वेळ मारून नेतात. संजय राऊत हे गल्लीबोळातल्या नेत्यांपासून दिल्लीत पंतप्रधानां सुद्धा सोडत नाहीत.भाजपचा खरा शत्रू हा फक्त शिवसेनाच आहे म्हणून अन्य पक्षावर भाजप तितका जोरकस वार करत नाही.भाजपाकडे अभ्यासू व तडाखेबाज वक्तव्य करणाऱ्यांची भली मोठी फौज आहे.एकटे संजय राऊत त्यांचा तितक्याच जोरकसपणे प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताना महाआघाडीतील अन्य नेत्यांचा म्हणावा तसा त्यांना प्रतिसाद मिळत नाही.छोटासा विरोध दर्शवून कातडी बचाव धोरण वापरतात..ज्या प्रमाणे किरीट सोमय्या भक्कम पुराव्यानिशी आरोप करून त्यात ते यशस्वी होतात तसे संजय राऊत भक्कम पुरावे देण्यात कमी पाडतात असे वाटते.सोमय्यां पितापुत्रांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करून तशी दणदणीत पत्रकार परिषद घेतात,त्यात त्यांना यश का मिळत नाही.उलट शिवसेनेची पीछेहाटच होताना दिसते.भाजप शिवसेनेवर कोणताही विधिनिषेध न बाळगता जबरदस्त प्रहार करते त्याउलट संजय राऊत हे मला सर्व माहित आहे योग्य वेळी पर्दाफाश करू,”मार्क माय वर्ड”असे बोलून वातावरण निर्मिती करतात पण तसे घडताना दिसत नाही संजय राऊत यांनी वेकय्या नायडू ,पंतप्रधान याना लेखी तक्रार करूनसुद्धा त्याची दखल घेत नाही तर त्यावर जबरदस्त तोडगा काढणे गरजेचे आहे पण तसे होताना दिसत नाही.हि एक प्रकारे शिवसेनेची पीछेहाटच आहे.
केंद्र सरकार ज्या प्रमाणे प्रशासकीय यंत्रणांचा वारेमाप गैरवापर करून विरोधकांना नाकी नऊ आणतात तसा प्रयोग राज्य सरकारने योग्य वापर करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना त्यात यश मिळत नाही उलट माघार घेऊन तोंडघशीच पडतात अशी अनेक प्रकरणे उघड झाली आहेत. महाराष्ट्रातील शिवसैनिक हे बाळासाहेबांच्यावरील जाज्वल्य भक्तीमुळे फोफावली व टिकून आहे.शिवसेना पक्षाची लक्तरे रोज वेशीवर टांगण्यात भाजप यशस्वी होताना पाहून शिवसैनिक आतल्याआत घुसमटतो आहे.पण नेतेमंडळी भाजपला धडा शिकवण्यात कमी पडतात ह्याच शल्य नक्कीच जाणवत असणार.अनिल देशमुख,वळसे पाटील हे गृहमंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत तरी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी राज्याची ढासळलेल्या प्रतिमेवरची जळमटे दूर करण्यासाठी भास्कर जाधव सारख्या धडाकेबाज,अभ्यासू नेत्याला गृहमंत्रीपदी बसवणे हि काळाची गरज आहे. शिवसेना प्रवक्ता म्हणून सुद्धा भास्कर जाधव याना संधी दिली तर संजय राऊत यांच्यावरचा भार हलका होईल.ईडीची वाढती अनैसर्गिक दहशत पाहता संजय राऊत ह्यांचं वैचारिक मानसिक संतुलन बिघडून त्यांच्या शब्दांचा भडीमार पातळी सोडून होत आहे संजय राऊत यांनी दोन दिवस तरी अज्ञातवासात जाऊन मेडिटेशन करावे व ताजेतवाने होऊन विरोधकांना नेस्तनाबुत करण्यासाठी आपली पुढील राजकीय वाटचाल भक्कमपणे तेजोमय करावी.
.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here